Horoscope 21 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी कोणत्याही सुंदर ठिकाणी जाऊनही तुम्ही आनंद घेऊ शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी मित्र किंवा नातेवाईकांबद्दलचे गैरसमज दूर होतील. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला लोकप्रियता आणि प्रशंसा मिळेल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी मालमत्ता गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी तुमची समस्या एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत शेअर केल्याने तुमचे मन हलके होईल. उद्योजक आणि व्यावसायिक नवीन सहवास किंवा भागीदारी करू शकतात.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी मालमत्तेच्या विक्रीशी संबंधित काम तुमच्या हिताचे होण्याची शक्यता आहे. तुमच्या नातेवाईकांसोबत तुमचे संबंध तणावपूर्ण असू शकतात
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य उत्तम राहिल मात्र हलगर्जीपणा करु नये.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू ही अपेक्षेपेक्षा अधिक भक्कम असेल. संपत्ती आणि मालमत्तासंदर्भात व्यवहार करताना कागदपत्र काळजीपूर्वक पाहाल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी पैशांचा विचारपूर्वक वापर कराल. नोकरीत प्रमोशन होण्याची चिन्हं आहेत. व्यवहारात सकारात्मक बदल होतील.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी तुम्ही दिलेला सल्ला इतरांना उपयोगी पडेल. पैशाची गुंतवणूक शुभ राहील. तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि मित्रांना भेटण्याची संधी मिळेल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कामात तुम्ही तुमचे पूर्ण सहकार्य द्याल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी काही महत्वाचे निर्णय घ्याल. नवीन काही तरी करण्याचा विचार सतत डोक्यात येत असेल. लवलाईफ खूप चांगली असणार आहे.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी काही नवीन व्यवसाय करण्याचा विचार कराल. नवीन जबाबदाऱ्या येत्या काळात मिळणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.