13 Number is Unlucky : अंक 13 ज्या नंबरला अनेक लोक अशुभ मानतात. मात्र काही लोकांचे म्हणणे आहे की, हा अंधविश्वास आहे. यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. मात्र मनोविज्ञानात 13 या अंकाची भीती तर आहेत. पण 'थर्टीन डिजिट फोबिया' किंवा ट्रिस्कायडेकाफोबिया असे म्हटले जाते. लोकांच्या मनात या नंबरवरून भीती पाहायला मिळत आहे. जगभरात असंख्य हॉटेल आहेत पण यामध्ये 13 नंबरचा रुमच नाही. एवढंच नव्हे तर भारतातील चंदीगडमधअये 13 नंबरचे सेक्टरच नाही. एवढंच नव्हे तर शुक्रवारी परदेशात 13 नंबरच्या तारखेला घराबाहेरच पडत नाहीत. एवढंच नव्हे तर अनेक इमारतींवर 13 नंबरचा माळाच नाही. का 13 या नंबरला मानले जाते अशुभ?
13 अंक अशुभ मानण्याचे धार्मिक कारण हे आहे की, येशू ख्रिस्त यांना रात्रीच्या भोजनाच्यावेळी एका व्यक्तीने त्यांचा विश्वासघात केला. 13 नंबरच्या खुर्चीवर ती व्यक्ती बसली होती. एवढंच नव्हे तर विदेशात 13 नंबरची खुर्ची देखील नसते. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 13 नंबर अंक ज्योतिष शास्त्रानुसार शुभ मानला जात नाही. कारण 12 नंबर पुर्णत्वाचे प्रतिक मानले जाते. यामध्ये आणखी एक नंबर जोडला जाणे अशुभ मानले जाते.
काही ठिकाणी हा 13 नंबर मृत्यूचा नंबर म्हणून ओळखला जातो. तर काही व्यक्ती या नंबरला परमेश्वराशी जोडतात. ब्राझीलमध्ये कोपेरस धर्माला मानणारा वर्ग देखील आहे. 12 हा अतिशय परफेक्ट म्हणून ओळखला जाणारा नंबर आहे. जसे की कॅलेंडरमध्ये 12 महिने आहे. दिवसात 12-12 तास आहे. म्हणून हे परफेक्ट मानले जाते. 12 च्या जवळ असूनही 13 हा अंक अशुभ मानला जातो.
जपानमध्ये '9' हा आकडा अशुभ मानला जातो, कारण कदाचित तो जपानी शब्दाच्या उच्चार सारखा वाटतो. दुसरीकडे, इटलीमध्ये लोक ‘17’ ला अशुभ मानतात.
चीनमध्ये, लोक '4' हा आकडा 'मृत्यू'शी जोडतात आणि चीनी लोक पाश्चात्य संस्कृतीत '13' पेक्षा '4' अधिक दैनंदिन जीवनात टाळतात.
विशिष्ट भीतीचे अनेक प्रकार आहेत आणि लोकांना त्या वेगवेगळ्या मानसिक कारणांमुळे असतात. ते थेट नकारात्मक अनुभवांमुळे उद्भवू शकतात. बरेच लोक विश्वासाने वाढतात आणि संख्या अशुभ असल्याबद्दल ऐकतात. दैनंदिन जीवनात, 12 क्रमांक 13 पेक्षा अधिक गोष्टींशी संबंधित आहे. 13 वा महिना नाही, 13-इंच शासक नाही आणि 13 वाजले नाहीत.