Horoscope 22 June 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना जुन्या आठवणी मनात गोंधळ घालतील!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Updated: Jun 21, 2023, 11:24 PM IST
Horoscope 22 June 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना जुन्या आठवणी मनात गोंधळ घालतील! title=

Horoscope 22 June 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी तरुणांना आपले मन ज्ञानाभोवती गुंतवावे लागेल, जेणेकरून ज्ञान वाढेल.  वडिलांकडून सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. सरकारी क्षेत्रांतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी तुमच्या मित्रांबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. म्हाला एखाद्या विशेष कार्यक्रमांतर्गत अडकलेले पैसे मिळतील. नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

सिंह (Leo)

आजच्या दिवशी तुमच्या वडिलांकडून तुमच्यावर काही महत्त्वाचे काम सोपवले जाईल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचे संकेत आहेत.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी अविवाहितांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल.  तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला उद्या परत मिळतील. तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावा. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ अजिबात करु नका. खर्चात अनपेक्षित वाढ झाल्यानं तुमचा ताण काहीसा वाढेल. कोणीतरी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकते म्हणून सावध रहा.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी बेरोजगारांसाठी उत्तम रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी तुमच्याकडे चालून येईल. व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल.  

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्याचा रोष सहन करावा लागू शकतो. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक गुंतवणूक करा. काही जुन्या गोष्टींच्या आठवणी तुमच्या मनात गोंधळ घालतील.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर अजिबात घाई करु नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा दबाव आणि घरातील कलह यामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाच्या कामात अडचणी येऊ शकतात.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या ओळखीच्या ठिकाणी जाल, जिथे अनेक नव्या ओळखी होतील. तुमच्या कामाची पोचपावती म्हणून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )