Horoscope 29 December 2022 : या राशीच्या व्यक्तींनी मोठे व्यवहार करणं टाळावं!

जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

Updated: Dec 28, 2022, 11:25 PM IST
Horoscope 29 December 2022 : या राशीच्या व्यक्तींनी मोठे व्यवहार करणं टाळावं! title=

Horoscope 29 December : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.

मेष 

आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळपर्यंत उत्तम बातमी मिळणार आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका. मित्रांची साथ मिळणार आहे.

वृषभ

या राशीच्या व्यक्तींनी आज नोकरीत बदल करणं फायदेशीर ठरेल. शिवाय आजच्या दिवशी गाडी काळजीपूर्वक चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळतील. 

मिथुन

आजच्या दिवशी तुम्हाला असलेल्या व्यावसायिक समस्या कमी होणार आहेत. जोडीदाराची तब्येत बिघडेल.

कर्क

कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.

सिंह

आजचा दिवस खूप त्रासदायक राहू शकतो. घरी पाहुणे येण्याचा योग आहेत. उसणवारी दिलेले पैसे परत मिळणार आहे.

कन्या

आजच्या दिवशी व्यापार आणि व्यवसायात यश मिळणार आहे. कुटुंबातीस कलह तसंच क्लेश संपणार आहेत. 

तूळ 

महत्त्वाची कामं आज रखडू शकतात. तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू शकता. नशिबाच्या मदतीने तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता.

वृश्चिक

तुमचा संपूर्ण दिवस छान मस्तीमध्ये जाणार आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळणार आहे.

धनू

आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होणार आहे. व्यवसायात देखील फायदा होणार आहे.

मकर

गुरुवार तुमच्यासाठी चांगला दिवस असणार आहे. मोठे व्यवहार करणं टाळावं. महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहेत.

कुंभ

कुटुंबाकडून आज सुख मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहकार्य मिळणार आहे.

मीन

दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होणार आहे.