Horoscope 19 october 2022 : आज 'या' राशीच्या व्यक्तींसाठी खास दिवस, दुरावलेलं प्रेमाचं माणूस परत येणार

काय सांगतं आजचं राशीभविष्य? कुठे थांबावं, कुठे सावध व्हावं एकदा पाहाच 

Updated: Oct 19, 2022, 07:20 AM IST
Horoscope 19 october 2022 : आज 'या' राशीच्या व्यक्तींसाठी खास दिवस, दुरावलेलं प्रेमाचं माणूस परत येणार  title=
Daily rashibhavishya Horoscope 19 october 2022 astro

Horoscope 19 october 2022 : सध्या संपूर्ण माहोल सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळत आहे. निमित्त आहे ते म्हणजे दिवाळीचं. मग यात, तुमचा संपूर्ण दिवसही मागे कसा बरं राहील... नव्या दिवसाची सुरुवात करुया आजच्या राशीभविष्याने... 

मेष (Aries Horoscope Today)
कोणत्याही वादात अडकू नका. आज सर्वांशी चांगलं बोला. आज तुमच्या हक्काचं माणूस परत येणार आहे. 

वृषभ (Today Taurus Horoscope)
वैवाहिक आयुष्यात सुधारणा होतील. प्रवासयोग आहेत. नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी आहेत. 

मिथुन (Today Gemini Horoscope)
कुटुंबाची मदत मिळणार आहे. अडचणी दूर होतील. व्यवसायात फायदा मिळणार आहे. 

कर्क (Cancer Horoscope Today)
नव्या कामाची सुरुवात कराल. कामं वेळेत पूर्ण करा. इतरांची मदत करा. आज तुमच्या हक्काचं आणि प्रेमाचं दुरावेलं माणूस एकाएकी परत भेटणार आहे. 

सिंह (Leo Horoscope Today)
मोठ्यांना मान द्या. जोडीदाराशी असणारे मतभेद संपणार आहेत. कामांवर लक्ष द्या. अडकलेली कामं मार्गी लावा. 

कन्या (Horoscope Virgo Today)
विवाहोत्सुकांसाठी स्थळ येणार आहे. आजचा दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतो. फक्त संधीवर लक्ष ठेवा. 

तुळ (Libra Horoscope Today)
जोडीदाराच्या नजरेत तुमच्याप्रती असणारा आदर वाढेल. जोडीदाराची साथ कधीच सोडू नका. रात्री उशिरापर्यंत फिरू नका. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
व्यवसायात नव्याने पैसे गुंतवू नका. एखाद्या मोठ्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. अर्थार्जनाचा योग आहे. 

धनु (Sagittarius Horoscope Today)
नोकरीमध्ये बढती मिळण्याची संधी आहे. दिवाळीचा शुभ काळ आतापासूनच सुरु होार आहे. नव्या संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत.

मकर (Today Capricorn Horoscope)
मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कोणाशीही वाद घालू नका. पूर्वसूचना मिळताच संकटांविषयी सावध व्हा. 

कुंभ (Today Aquarius Horoscope)
नोकरीमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. आज कामाच्या बळारव वरिष्ठांचं मन जिंकाल. व्यायाम करा. 

मीन (Pisces Horoscope Today)
व्यावसायिकांना आज फायदा होणार आहे. मुलाबाळांकड़ून आनंदवार्ता कळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल.