Dev Diwali 2022: नेमकी कधी आहे देव दिवाळी, आज की उद्या? पाहा का खास आहे हा दिवस

दरवर्षी कार्तिक (Kartik) महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी (Dev Diwali 2022) साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी तो दिवस कधीये ते आताच पाहा

Updated: Nov 7, 2022, 06:38 AM IST
Dev Diwali 2022: नेमकी कधी आहे देव दिवाळी, आज की उद्या? पाहा का खास आहे हा दिवस  title=
Dev Diwali 2022 date significance and mahurat chandra grahan 2022

Dev Diwali 2022 : दरवर्षी कार्तिक (Kartik) महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी (Dev Diwali 2022) साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी हा दिवस सोमवार म्हणजेच 7 नोव्हेंबर (November) रोजी (आज) साजरा केला जाणार आहे. अशी मान्यता आहे की देव दिवाळीच्या दिवशी देवदेवता श्रीक्षेत्र काशी (Kashi Diwali celebration) येथे येतात आणि तिथं हा दिपोत्सव साजरा करतात. या दिवशी पवित्र नद्यांच्या पाण्यानं स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. सोबतच या दिवशी दीपदान करणंही शुभ मानलं जातं.

काय आहे दीपदानाचं महत्त्वं? (Significance of dip daan)

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांच्या पाण्यानं स्नान केल्यानंतर दीपदान केलं जातं असं म्हणतात. पण, तेसुद्धा नदी किनारीच करावं असं म्हणतात. अशी धारणा आहे की देव दिवाळीच्या दिवशी असं केल्यास घरात सुखसंपत्ती नांदते, सर्व देवदेवतांचा आशीर्वाद मिळतो. वाराणासीमध्ये हा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.

का साजरा होते देव दिवाळी? (Significance of Dev Diwali)

देवादिदेव महादेवानं त्रिपुरासुर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला तोच हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस. त्रिपुरासुराच्या वधानं देवदेवतांनी काशी क्षेत्री दीप प्रज्वलित करत आनंद व्यक्त केला होता. याच कारणामुळं कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. ही दिवाळी देवांनी साजरा केल्यामुळं तिला देव दिवाळी असं म्हणतात.

शंकराच्या पुजेनं मिळणार शुभाशीर्वाद

शंकरानं या दिवशी त्रिपुरासुराचा वध केल्यामुळं हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurai Paurnima) म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी शंकराची पूजा केली जाते. असं म्हणजाज जो कोणी आजच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा करेल त्याच्यावर देवाचा वरदहस्त असेल. आजच्या रात्री जागरण करुन शंकराची आराधना करणाऱ्यांना गुरुचं बळ मिळतं. चुकांचं प्रायश्चित्त करण्यासाठीही आज अनेकजण शंकराची पुजा करतात.

वाचा : Horoscope 7 November : 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीत यश मिळण्याची शक्यता!

तिथी आणि मुहूर्त (Dev Diwali Mahurat)

पंचांगानुसार (Todays Panchang) सोमवारी 7 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी कार्तिक पौर्णिमेची सुरुवात होत आहे. 8 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजून 31 मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे. देवदिवाळीसाठीचा प्रदोष कालावधी 7 नोव्हेंबरला असल्यामुळं आजच ती साजरी केली जाणार आहे. आजच्य़ा दिवशी पुजेचा मुहूर्त सायंकाळी 5 वाजून 14 मिनिटांपासून 7 वाजूनन 49 मिनिटांपर्यंत आहे. 8 तारखेला चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) असल्यामुळंही देवदिवाळी 7 तारखेला (आज) साजरी होणार आहे.

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि धारणांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)