Diwali 2022 : ‘या’ लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशांची कमरता

Diwali 2022 : दिवाळीत विशेषत: देवी लक्ष्मीची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. दिवाळीत (Diwali 2022) देवी लक्ष्मीसोबतच, श्री गणेश, कुबेर आणि सरस्वती या देवतांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार प्रदोष काळात लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Updated: Oct 20, 2022, 10:36 AM IST
Diwali 2022 : ‘या’ लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशांची कमरता   title=

Diwali 2022 :  दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळी साजरी (Diwali 2022 Tithi and shubh muhurta) केली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या दिवशी भगवान राम (shri Ram) लंका जिंकून अयोध्येला परतले होते. (diwali 2022 laxmi puja 2022)

या वर्षी, दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी (Lakshmichi Puja) सर्वात शुभ मुहूर्त 24 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 07:02 ते 08.23 पर्यंत प्रदोष कालात असेल. दुसरीकडे, निशिता मुहूर्त 24 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 11.46 ते 12.37 पर्यंत असेल.

या लोकांवर आई लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही

दिवाळीच्या मुहूर्तावर हेही जाणून घ्या की, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आई लक्ष्मी प्रसन्न होत नाही. जेणेकरून त्या चुका तुमच्याकडून होणार नाही. 

- जे लोक अस्वच्छतेप्रमाणे राहतात त्यांच्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही.  स्वतःला नेहमी स्वच्छ ठेवा, स्वच्छ कपडे घाला आणि आपल्या आजूबाजूलाही स्वच्छता ठेवा. घर आणि कार्यालयात गोष्टी व्यवस्थित आणि स्वच्छतेत ठेवा. यामुळे सकारात्मकता राहते आणि व्यक्ती निरोगी राहते.

वाचा : चाहत्यांनो तयार व्हा ! IND vs PAK सामना होणार आणखी थरारक, पाहा होणार तरी काय  

- कधीही लोभी होऊ नका आणि अप्रामाणिकपणा दाखवून कोणाचे पैसे हडप करून फसवणूक करू नका. अशा लोकांपासून माता लक्ष्मी नेहमी दूर राहते. जे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात तसेच इतरांना मदत करतात अशा लोकांवर लक्ष्मी प्रसन्न असते.

- अनैतिक गोष्टी करणाऱ्या, उशिरा झोपणाऱ्या आणि मादक पदार्थांच्या व्यसनासारख्या वाईट सवयींनी ग्रस्त असलेल्या लोकांना लक्ष्मी कधीही आशीर्वाद देत नाही. अशा लोकांना वारसाहक्काने भरपूर पैसा मिळाला तरी तो वाया जायला वेळ लागत नाही.

- माता लक्ष्मी जी नेहमी रागीट आणि अहंकारी लोकांपासून दूर राहतात. अहंकारामुळे सुवर्ण लंकेचा राजा रावणाला सर्वस्व गमवावे लागले. लंकेचीही राख झाली आणि रावणाचाही वध झाला. त्यामुळे राग आणि अभिमानापासून नेहमी दूर राहा.

 

 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS NEWS त्याची पुष्टी करत नाही.)