Dhanteras 2023 Puja Muhurat Time And Vidhi : धन धान्याची व्हावी घरीदारी रास, राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास...आज धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस...दिवाळीचा (Diwali 2023) दुसरा दिवस...यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार कुबेर आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते. हा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. यंदा धनत्रयोदशीला 59 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग आला आहे. या दिवशी शुक्र प्रदोष आणि विष कुंभ योग एकाच दिवशी आहे. (diwali dhanteras or dhantrayodashi 2023 Puja Shubh Muhurat kuber puja and Dhanwantari dhanteras Puja vidhi video)
हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशी ही त्रयोदशी तिथी साजरी करणात येते. तर पंचांगानुसार त्रयोदशी तिथी 10 नोव्हेंबरला दुपारी 12.38 पासून सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबरला सायंकाळी 01.57 वाजेपर्यंत असणार आहे. पूजेचा मुहूर्त 10 नोव्हेंबरला संध्याकाळी आहे 05:48 ते 07:47 पर्यंत असणार आहे.
प्रदोष कालावधी - संध्याकाळी 17:30 ते 20:08
वृषभ राशीचा काळ - संध्याकाळी 17:48 ते 19:44
धन्वंतरी पूजा सकाळचा मुहूर्त - 06.30 am - 08.50 am
धनतेरस पूजा मुहूर्त - संध्याकाळी 7.31 - 8.36
यम दीपम मुहूर्त - 06.07 pm - 07.22 pm
10 नोव्हेंबरला दुपारी 2.35 ते 6.40 या वेळेत वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी सोनं, चांदी, भांडी, मालमत्ता, वाहनं, पुस्तकं, झाडू, दागिनं इत्यादी खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं.
गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी गणेशाला शुभ मुहूर्तावर स्नान करावे. दिवा लावल्यानंतर गणपतीला गेनू, दुर्वा, चंदन, कुमकुम, मोली, लाल वस्त्र, लाल फुले, लाडू किंवा मोदक अर्पण करा.
गणेश मंत्र - वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम्प्रभ. निर्विघ्न कुरुमधील देव नेहमी कार्य करतो
ज्याप्रमाणे लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे, त्याचप्रमाणे कुबेर देवता ही संपत्तीचा राजा मानला गेला. धनत्रयोदशीला कुबेर देवतेचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करून रोळी, हळद, अक्षत, फुलं, नैवेद्य, फळं अर्पण करा. पूजा करताना मंत्राचा जप करा. कुबेराची पूजा केल्याने पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्य प्राप्ती होते.
कुबेर मंत्र - ओम यक्षय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतिये धनसंपदा.
सगळ्यात आधी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात, तिथे भूमी पूजन करा आणि नंतर रांगोळी काढा. मग घंटीचं पूजन करा. माता लक्ष्मीच्या फोटोची स्थापना करताना खाली प्रथम तांदूळ ठेवून मग त्यावर फोटीची स्थापना करा. मग गणपती, कुबेर यांचा फोटो अथवा सुपारी आणि धन्वंतरी यांची स्थापना करा. त्यानंतर तांदूळ ठेवून कलथ स्थापना करुन पूजा करा. व्हिडीओद्वारे पाहा धनत्रयोदशीची पूजा