मुंबई : रात्री झोपेत स्वप्नं पाहणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नं आपल्याला अनेक शुभ किंवा अशुभ संकेत देतात. अशी अनेक स्वप्नं असतात जी झोपेतून उठल्यानंतर आपल्याला आठवत नाहीत. शिवाय अशीही काही स्वप्न जी असतात, त्यांच्याबद्दल आपण कुतूहलाने लोकांशी बोलतो.
परंतु स्वप्न शास्त्रात अशी काही स्वप्नं सांगितली आहेत, जी कधीही इतरांना सांगू नयेत. अन्यथा त्यांच्यापासून शुभ परिणाम कमी होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती स्वप्नं
स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात चांदीच्या दागिन्यांनी भरलेला कलश दिसला तर असं स्वप्न इतर कोणाशीही शेअर करू नका. असं म्हणतात की, तुमच्या स्वप्नात चांदीच्या दागिन्यांनी भरलेला कलश पाहणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि त्रास येत्या काळात दूर होणार आहेत.
स्वप्न शास्त्रात सांगितलं गेलंय की, जर तुम्हाला लाल फुलांची बाग किंवा निसर्गाशी संबंधित इतर गोष्टी जसं की नदी, पर्वत, झाडं दिसली तर असी स्वप्न खूप शुभ मानली जातात. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. त्यामुळे या स्वप्नाबद्दल कोणाशीही बोलू नका, अन्यथा त्या शुभ परिणामाचा प्रभाव कमी होतो.
जर तुम्ही स्वप्नात एखादा मासा पाण्यात पोहताना पाहिला असेल किंवा स्वतःला किंवा इतर कोणीतरी मासे पकडताना पाहिलं असेल तर ते देखील शुभ परिणाम मिळण्याचे संकेत आहे. अशी स्वप्न अचानक पैसे येण्याचे संकेत मानले जातात. पण स्वप्न शास्त्रानुसार, अशा स्वप्नांचा उल्लेख इतर लोकांसमोर करू नये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)