मुंबई : स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. अनेक वेळा स्वप्नं तुमच्या भविष्यात घडणाऱ्या शुभ घटना दर्शवतात, ज्या तुम्हाला समजत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया कोणती स्वप्नं आहेत जी धनलाभ आणि सुखी वैवाहिक जीवन दर्शवतात.
स्वप्न विज्ञानाच्या तज्ज्ञांच्या मते, स्वप्नं आपल्याला जीवनात घडणाऱ्या अनेक शुभ-अशुभ घटनांचे संकेत देतात, परंतु आपल्याला त्या समजत नाहीत. कधी भयानक स्वप्न पाहतात तर कधी स्वप्नात चांगल्या घटना घडतात. चला तर मग जाणून घेऊया कोणती स्वप्ने तुमच्या आयुष्यात शुभ होण्याचे संकेत मानली जातात.
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला पाण्यात पोहताना दिसलं तर ते तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचं लक्षण मानलं जातं. याशिवाय स्वप्नात स्वत:ला आंबे खाताना, पाण्यात पोहताना किंवा स्वप्नात एखादं मूल हसताना दिसलं तर स्वप्न शास्त्रानुसार, ही स्वप्नंही अचानक संपत्तीचं लक्षण मानली जातात.
स्वप्नातील शास्त्र सांगतं की, जर एखाद्या पुरुषाने स्वप्नात स्वतःला मुंडण करताना किंवा दाढी करताना पाहिलं तर याचा अर्थ असा होतो की, त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व त्रास लवकरच संपणार आहेत. तर दुसरीकडे स्वप्नात स्वतःला मध खाताना पाहणं हे लवकर लग्न होण्याचं लक्षण मानलं जातं.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)