कोणता रंग तुमच्या आयुष्यात भरेल सुखाचे रंग, जाणून घ्या

घराला खिडकीचे जितके महत्व आहेत तसेच घराला कोणता रंग असावा याचेही एक महत्व आहे. 

Updated: Apr 29, 2022, 04:30 PM IST
कोणता रंग तुमच्या आयुष्यात भरेल सुखाचे रंग, जाणून घ्या title=

मुंबई : घराच्या खिडक्या हे डोळे आहेत. यामधून तुम्ही घराबाहेरील जग पाहू शकता. डोळ्यांना काही त्रास होत असेल तर घरातील खिडक्या प्रथम आतून व बाहेरून नीट स्वच्छ करून पुसून घ्याव्यात. तसेच खिडकीत क्रिस्टल टांगून बाहेरचा प्रकाश आत आणण्याची व्यवस्था करावी.

घराला खिडकीचे जितके महत्व आहेत तसेच घराला कोणता रंग असावा याचेही एक महत्व आहे. घरासाठी वेगवेगळ्या शेड्स आता बाजारात उपलब्ध आहेत. पण जे मूळ रंग आहेत त्याबाबत थोडे जाणून घेऊ.   

लाल रंग : भूक वाढवतो. शारीरिक शक्तीत वाढ करतो. उत्साह देतो. महत्त्वाकांक्षी बनवतो. 

नारंगी रंग : माणसाला आशावादी बनवतो, तुमच्यात आत्मविश्वास वाढवतो. समाजसेवा करवून घेतो. मनातील सुहृदयता जागृत करतो.

पिवळा रंग : बुद्धी, प्रतिभा वृद्धिंगत करतो. खोलवर विचार करण्याची प्रेरणा देतो. विचारविनीमय करून अनेक पदव्या मिळवतो. पिवळा रंग स्वातंत्र्य व प्रामाणिकपणाचे प्रतिक आहे. जीवनात कार्यसिद्धी प्राप्त होते.

हिरवा रंग : वातावरणात संतुलन उत्पन्न करतो. विकासाचे मार्ग दाखवतो. हृदयाची विशालता व आशा वाढीस लागते. बक्षिस मिळते. रोगाचे निवारण करण्यात, संतुलन साधण्यात सहाय्यक होतो.

निळा रंग : आध्यात्मिकेत वाढ करतो. धैर्य प्रदान करतो. त्याच बरोबर व्यक्तीच्या भक्ती, शक्ती, श्रद्धा, प्रेरणा व संतुष्टीत वाढ करतो.

जांभळा रंग : शुद्धतेचे प्रतिक आहे. संतुलन ठेवण्यास या रंगाची मोठी मदत होते. हृदयाचा मोठेपणात वाढ करतो.

पांढरा रंग : वैराग्य सूचवतो आणि जीवन शुष्क बनवतो.

काळा रंग : स्थैर्य, अशांती, मानसिक व्यग्रता आणि स्वभाव चिडचिडा बनवतो. 

रंगामुळे शक्ती प्राप्त होते. या शक्तीमुळे त्याचा मूड, वळण, संबंधांच्या बाबतीत काहीही म्हणता येईल. उष्ण रंग बहिर्मुख व्यक्ती पसंत करतात तर थंडावा देणारे रंग माणसाला अंतर्मुख बनवतात. 

घरात हे करा सोपे उपाय 

घरात फॅमिली फोटो, ग्रुप फोटो तृतीय क्रमांकाच्या विभागात लावावा. 

बुकशेल्प पुढे किंवा कॅरीडॉरमध्ये ठेवावे. जिन्यावर ठेऊ नये.

शिडीवरून शक्ती खाली उतरते म्हणून शिडीवर संपूर्ण कुटुंबाचा फोटो ठेवण्याने घरात विसंवादिता उत्पन्न होते. 

जीवनात कोणत्याही कार्यात अडथळा येत असेल तर जागा स्वच्छ ठेवावी, त्यात सुधारणा करून स्थान पवित्र बनवावे.