Ganesh Jayanti 2023: गणेश जयंतीनिमित्ताने बप्पाला या 5 वस्तूंचा नैवेद्य दाखवा, उघडेल प्रगतीचे दरवाजे

Ganesh Jayanti 2023: गणेश जयंतीला बाप्पाला काही गोष्टी अर्पण करताना मंत्र म्हटल्याने तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडतील. आज माघी गणेश जयंती आहे.  माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला.

Updated: Jan 25, 2023, 10:25 AM IST
Ganesh Jayanti 2023: गणेश जयंतीनिमित्ताने बप्पाला या 5 वस्तूंचा नैवेद्य दाखवा, उघडेल प्रगतीचे दरवाजे  title=

ilkund Jayanti 2023: भगवान गणेशाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला. म्हणूनच या दिवशी तिलकुंड चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणेशाचे व्रत आणि काही उपाय केल्याने विशेष फळ मिळते आणि प्रगतीचा दरवाचा उघडतो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणेशजींची पूजा केली जाते. या दिवशी उपवास करुन काही आवश्यक उपाय केल्याने व्यक्तीचे भाग्य उजळते. यावेळी गणेश जयंती आज बुधवार, 25 जानेवारी रोजी आहे. अशा स्थितीत आजच्या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. एवढेच नाही तर आज रवियोग, परिघ योग, रवियोग आणि शिवयोग तयार होत आहेत. अशा वेळी गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर गणेशाला प्रिय वस्तू अर्पण केल्याने किंवा नैवेद्य दाखविल्याने माणसाच्या प्रगतीचे दरवाजे उघडतात. यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.

रवियोगात गणेश जयंती 

ज्योतिष शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या दिवशी रवियोग तयार होत आहे.  रवि योग सकाळी 07:13 ते रात्री 08:05 पर्यंत असेल. त्याचवेळी, या दिवशी गणेश पूजेचा शुभ मुहूर्त 11.29 ते दुपारी 12.34 पर्यंत आहे. अशा स्थितीत रवियोगात तिलकुंड चतुर्थी साजरी होईल.

लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव 

 आख्यायिकेत असे सांगितले जाते की, जेव्हा माता लक्ष्मीने गणेशाला आपला पुत्र मानले, तेव्हा तिने त्याला वरदान दिले होते. ज्या घरात गणेशाची पूजा केली जाईल, तेथे लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य असेल. या कारणास्तव गणेश जयंतीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

या वस्तू श्रीगणेशाला अर्पण करा

- गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला मोदक अर्पण करा. असे मानले जाते की गणपतीला मोदक खूप आवडतात. या दिवशी गणेशाला मोदक अर्पण केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.

- दुसरीकडे या दिवशी केळी भोग चढवावा. ज्योतिष शास्त्रानुसार केळी देखील गणेशाला खूप प्रिय आहे. पण केळी नेहमी एकत्र गठ्यात अर्पण करा.

- ज्योतिषशास्त्रानुसार गणेशाला माखणा खीरही अर्पण केली जाऊ शकते. देवी लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे. अशा स्थितीत गणेशजींना खीर अर्पण केल्याने धन आणि संपत्तीचे आशीर्वाद प्राप्त होतात.
 
- गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी केशरयुक्त श्रीखंडाचा भोगही अर्पण करता येतो. यामुळे बाप्पा खूप प्रसन्न होतो आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो.

- गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला बेसन लाडू किंवा मोतीचूर लाडू अर्पण केल्याने शुभ फळ मिळेल. याशिवाय सीताफळ, पेरू, बाईल किंवा जामुन वगैरेही गणेशाला अर्पण करता येते.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)