Ganesh Jayanti 2023 : हिंदू संस्कृतीत बाप्पाला महत्त्वाचे स्थान आहे. आपण नेहमी गणपतीची पूजा करतो. जानेवारी महिन्यात माघी गणेश उत्सव आहे. बुधवार, 25 जानेवारी रोजी माघी गणेश जयंती आहे. दुपारी 12.34 वा. उदयतिथीनुसार यंदा गणेश जयंती साजरी होणार आहे. बुधवार हा गणेश पूजनाचाही दिवस आहे. गणेश जयंतीला रवियोग, शिवयोग आणि परिघ योग तयार होत आहेत. तसेच गणेश जयंतीच्या दिवशी भाद्र आणि पंचकही असते.
मराठी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी आणि वरद कुंड चतुर्थी असेही म्हणतात. गणेश जयंती दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येते. भगवान शिव आणि माता पार्वतीचा पूत्र गणेश यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. गणपतीला आवडत्या वस्तू अर्पण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्यावरील विघ्नही दूर होते.
गणेश जयंतीनिमित्ताने यावर्षी गणेश जयंतीला रवी योग, शिवयोग आणि परिघ योग तयार होत आहेत. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 24 जानेवारीला दुपारी 3.22 वाजता सुरु होत आहे. बुधवार, 25 जानेवारी रोजी दुपारी 12.34 वा. उदयतिथीनुसार यंदा गणेश जयंती बुधवार, 25 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. बुधवार हा गणपतीच्या पूजनाचाही दिवस आहे.
गणपती पूजेचा शुभ मुहूर्त 25 जानेवारी रोजी सकाळी 11.29 ते दुपारी 12.34पर्यंत आहे. दरम्यान, या गणेश जयंतीला चंद्र पाहू नका. गणेश जयंती ही विनायक चतुर्थी आहे, त्यामुळे या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई आहे. चंद्र पाहिल्याने वाद उद्धभवतो, असे सांगितले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी 09.54 ते रात्री 09.55 पर्यंत चंद्रदर्शन निषिद्ध आहे. यामुळे ते दिवसा गणेशाची पूजा करतात.
गणेश जयंती निमित्ताने तीन योग होत आहेत. परिघ योग सकाळपासूनच असेल, जो संध्याकाळी 6:16 पर्यंत असेल. त्यानंतर शिवयोग सुरु होईल. या दिवशी रवी योग सकाळी 07.13 ते रात्री 08.05 पर्यंत असेल. तर भाद्र आणि पंचक देखील गणेश जयंतीला असतात भाद्र आणि पंचक देखील आहे. 25 जानेवारी रोजी पंचक संपूर्ण दिवस आहे आणि भाद्रा सकाळी 07:13 ते दुपारी 12:34 पर्यंत आहे.
शिवपुराणानुसार, माता पार्वतीने तिच्या कासेपासून एका मुलाची मूर्ती बनवून तिचा अभिषेक केला होता, ज्यातून गणेशाचा जन्म झाला. तो दिवस माघ शुक्ल चतुर्थी तिथी होता. त्यामुळे दरवर्षी या तारखेला गणेश जयंती साजरी केली जाते. या तिथीला गणेशजींचा जन्मदिवस असल्याने विधिपूर्वक पूजा केली की बाप्पा प्रसन्न होतात. त्याचा लाभ आपल्याला मिळतो.