मुंबई : आपल्या जवळच्या किंवा खास व्यक्तीला भेट म्हणून सोने देणे सामान्य आहे. ही प्रथा अनेक काळांपासून सुरु आहे आणि दिवसेंदिवस हा ट्रेंड अधिकाधिक वाढत चालला आहे. जेव्हा आपल्याला आपल्या जवळील वस्तुला कोणातीही भेटवस्तू द्यायचे असेल, परंतु काही दुसरं सुचत नसेल, तर लोक फक्त सोन्याचे गिफ्ट देतो. यामुळे समोरचा आनंदी राहातो शिवाय आपला स्टेटस देखील चांगला राहातो.
तसे पाहाता लोक सोनं एखाद्याला दान करावं असं देखील सांगतात. सोनं एखाद्याला दिल्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटे देखील आहे. चला जाणून घेऊया हे फायदे आणि तोटे.
सोन्याचे दागिने भेट देण्याबाबत असे म्हटले जाते की, जर तुम्ही एखाद्याला पैसे दान केले, तर त्याचे फळ तुम्हाला एकदाच मिळते. पण सोने, जमीन दान केल्याने माणसाला सात जन्म त्याचे फळ मिळते. त्यामुळे कोणाला काही दान करायचे असेल, तर सोन्याचे दागिने किंवा सोनं द्यावं.
सोने दान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर गुरु ग्रहाचा शुभ प्रभाव दिसून येतो.
ज्योतिष शास्त्र सांगते की जर तुमच्या कुंडलीत गुरु ग्रह शुभ फल देत नसेल, तर व्यक्तीला धार्मिक पुस्तके, सोने, पिवळे कपडे, केशर इत्यादी दान करणे फायदेशीर आहे.
असे म्हटले जाते की, ज्या लोकांची कुंडली आधीच शुभ आहे किंवा शुभ फल देत आहे. त्यांनी सोने दान करू नये. असे करणे त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते. यासोबतच ज्योतिष शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की, कुंडलीत गुरूची स्थिती पाहूनच तुम्ही स्वतः सोने परिधान करा. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)