गजकेसरी योगाने 3 राशीच्या लोकांना अचानक बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता

Gajkesari Rajyog 2023 in Mesh : गुरु आणि चंद्राचा संयोग जेव्हा जेव्हा होतो तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. हा सर्वात शुभ असा राजयोग लवकरच तयार होणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Jul 25, 2023, 05:25 AM IST
गजकेसरी योगाने 3 राशीच्या लोकांना अचानक बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता title=
guru chandra gochar in mesh will make gajkesari yoga benefits 3 zodiac signs get money

Guru Chandrama Yuti 2023 in Mesh : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या विशिष्ट वेळेनुसार आपली स्थिती बदलतात. या ग्रहामधील न्यायदेवता शनि हा अडीच वर्षांनी आपली स्थिती बदलत असतो. तर चंद्र हा साधारण 3 दिवसाने आपली रास बदलतो. तर बृहस्पति म्हणजे गुरु हा एका वर्षाने एका घरातून दुसऱ्या घरात प्रवेश करतो. गुरु ग्रहाने या वर्षी मेष राशीत प्रवेश केला असून तिथे तो 1 मे 2024 पर्यंत असणार आहे. लवकरच चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. येत्या 22 ऑगस्ट मेष राशीत गुरु आणि चंद्राचा संयोग होणार आहे. या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होतो आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या नशिबात अपार संपत्ती, सन्मान, पदोन्नती, प्रगती आणि आनंद घेऊन येणार आहे. (guru chandra gochar in mesh will make gajkesari yoga benefits 3 zodiac signs get money)

मेष (Aries)

गजकेसरी राजयोग मेष राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात वेगळी चमक दिसणार आहे. तुम्ही आनंदाने परिपूर्ण होणार आहात. आत्मविश्वास असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. विवाहित जोडप्यांसाठी हा आनंदाचा काळ असणार आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांना हा काळ फलदायी ठरणार आहे.

मिथुन (Gemini)

गजकेसरी राजयोग मिथुन राशीच्या लोकांना अतिशय शुभ ठणार आहे.  तुमच्या उत्पन्नात वाढणार आहे. अडकलेले पैसे मिळणार आहे. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ होणार आहे. तुमचं बँक बॅलन्स दिवसेंदिवस वाढणार आहे. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तुम्हाला गवसणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. तुमची परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. कौटुंबिक जीवनातील समस्यांवर तुम्ही मात करु शकणार आहात.

कर्क (Cancer)

 गजकेसरी राजयोग कर्क राशीच्या लोकांना करिअर - व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक परिणाम दाखविणारा ठरणार आहे. या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. सध्याच्या नोकरीतही तुम्हाला बढती-वाढ होणार आहे. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ सुवर्ण ठरणार आहे. त्यांना मोठ्या धनलाभ होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Astrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)