Guru Gochar 2023: मीन राशीत गुरु होणार अस्त; पुढील 1 महिना 'या' राशींवर येणार संकट!

गुरू ग्रहाच्या अस्तामुळे शुभ कार्यांमध्ये अडखळे येऊ शकतात. तर याचा अनेक राशींवरही विपरीत परिणाम दिसून येऊ शकतो. गुरु ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींच्या व्यक्तींचा जीवनात तसंच आर्थिक स्थितीमध्ये अनेक बदल होऊ शकतात. 

Updated: Mar 24, 2023, 11:15 PM IST
Guru Gochar 2023: मीन राशीत गुरु होणार अस्त; पुढील 1 महिना 'या' राशींवर येणार संकट!

Guru Gochar 2023: बृहस्पति 31 मार्च रोजी मीन राशीमधून अस्त होणार आहे. त्यानंतर 22 एप्रिल रोजी गुरु ग्रह हा मीन राशीमधून मेष राशीत प्रवेश करणार आहे. गुरू पुढील एक महिन्यासाठी त्या ठिकाणी राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बृहस्पतिचा अस्त शुभ मानला जात नाही. 

गुरू ग्रहाच्या अस्तामुळे शुभ कार्यांमध्ये अडखळे येऊ शकतात. तर याचा अनेक राशींवरही विपरीत परिणाम दिसून येऊ शकतो. गुरु ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींच्या व्यक्तींचा जीवनात तसंच आर्थिक स्थितीमध्ये अनेक बदल होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मिथुन राशी

मीन राशीत गुरु ग्रहाच्या अस्तामुळे या राशीच्या व्यापारी वर्गासाठी कठीण काळ येऊ शकतो. पार्टनरशिपमध्ये असलेल्या व्यवसायांमध्ये  काही समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तसंच या काळामध्ये वादविवादांपासून दूर रहावं. तसंच वैवाहिक जीवनामध्ये या राशीच्या व्यक्तींनी संतुलन राखण्याची गरज आहे. 

धनु राशी

या राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मीन राशीमध्ये गुरु ग्रहस्थितीमुळे धनु राशीच्या व्यक्तींना आरोग्यासंबंधी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमच्या आईलाही आरोग्याशी तक्रारी येऊ शकतात. रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींनीही नातं तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

कन्या राशी

या राशीच्या व्यक्तींनी वैवाहिक जीवनातील समस्यांना दूर करावं. कन्या राशीच्या राशीच्या लोकांना बृहस्पति मीन राशीत असल्यामुळे वैवाहिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात. या काळामध्ये कोणत्याही वादात न सापडणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तसंच कोणाशी बोलताना तुमचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडा. जोडीदाराशी भांडणं करणं टाळा.

कुंभ राशी

या राशीच्या व्यक्तींनी या कालावधीत बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. मीन राशीत गुरू ग्रहस्थितीमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींचं बोलणं कठोर होऊ शकतं. तुम्ही बोलताना तुमचे शब्द विचारपूर्वक वापरावेत. तसंच गुंतवणूक करणं टाळावं, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय आत्मविश्वासात कमतरता जाणवेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)