साडेसातीचा फेरा आणि शनिदेवांचा वचक असताना कसा मिळवाल दिलासा, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय

Shani Sadesati Upay: शनिदेव कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी आल्याने आता जातकांना काय करू आणि काय नको असं झालं आहे. शनिदेव ग्रहमंडळात न्यायदेवतेची भूमिका बजावत असल्याने काही चूक घडू नये असंच प्रत्येकाला वाटत आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्र व्यक्तीला शनिदेव तसा त्रास देत नाहीत. 

Updated: Jan 19, 2023, 07:58 PM IST
साडेसातीचा फेरा आणि शनिदेवांचा वचक असताना कसा मिळवाल दिलासा, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय title=

Shani Sadesati Upay: शनिदेव कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी आल्याने आता जातकांना काय करू आणि काय नको असं झालं आहे. शनिदेव ग्रहमंडळात न्यायदेवतेची भूमिका बजावत असल्याने काही चूक घडू नये असंच प्रत्येकाला वाटत आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्र व्यक्तीला शनिदेव तसा त्रास देत नाहीत. शनिदेवांना अहंकार जराही आवडत नाही. शनिदेव जातकांना आपल्या कर्मानुसार फळ देतात. सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीचे लोक साडेसातीच्या प्रभावाखाली आले आहेत. मकर राशीला शेवटची अडीच वर्षे, कुंभ राशीला मधली अडीच वर्षे आणि मीन राशीला पहिली अडीच वर्षे सुरु झाली आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु झाली आहे. धनु राशीची साडेसातीपासून, तर मिथुन आणि तूळ राशीची अडीचकीतून मुक्तता झाली आहे. 

काय उपाय कराल

  • शनिदेवांची साडेसाती, अडीचकी सुरु असताना जराही अहंकार बाळगू नये. सर्वांशी नम्रतेने वागावं.
  • साडेसाती सुरु असताना शनिस्तोत्र, शनिजप, मारुति स्तोत्र, हनुमान चालिसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड यांचं पठण करावं
  • शनि महाराजांचा 23 हजार जप केल्यास साडेसाती काळात दिलासा मिळतो.
  • साडेसातीच्या काळात मारुति, विष्णु आणि महादेवांची उपासना करावी. महादेव शनिदेवांचे गुरु आहेत. त्यांच्यातील गुण पाहूनच त्यांना त्यांनी नवग्रहांमध्ये न्यायाधीशाची भूमिका दिली आहे.
  • दर शनिवारी जातकांनी 11 वेळा शनिस्त्रोताचं पठण करावं. तसेच शनिवारी शनिशी निगडीत वस्तूंचं दान करावं.
  • पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावं.

बातमी वाचा- Lakshmi: देवी लक्ष्मी घरी येण्यापूर्वी देते 5 संकेत, काय सांगतं ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

शनिदेव कुंभ राशीत 29 मार्च 2025 सालापर्यंत ठाण मांडणार आहेत. त्यानंतर गुरुच्या मीन राशीत प्रवेश करतील. गुरु आणि शनि यांच्या मित्रत्त्वाचं नातं आहे. त्यामुळे त्यानुसार फळ मिळतं असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)