Transit of Jupiter in 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, बृहस्पतिला सर्व ग्रह आणि देवतांच्या गुरुची उपमा (guru gochar 2023) देण्यात असून तो सर्व ग्रहमंडलातील सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. त्यांच्या हालचाली आणि गोचरामुळे मनुष्याचा आयुष्यावर त्याचा खोलवर परिणाम होतो. बृहस्पति मेष राशीत असून तो 2024 पर्यंत तिथे विराजमान असणार आहे. गुरुच्या संक्रमाणामुळे काही लोकांची 2024 पर्यंत चांदीच चांदी आहे. या लोकांसाठी प्रत्येक दिवस दिवाळी सारखा असणार असून गुरु गोचरमुळे विशेष फळ प्राप्त होणार आहे.(guru gochar 2023 jupiter transit in 2023 these zodiac signs rich diwali atmosphere their house till 2024)
मेष राशीतील गुरु गोचरमुळे या राशींसाठी सर्वात अधिक शुभदायक ठरणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. गुरु हा धनु राशीच्या लोकांचा स्वामी आहे. तो या लोकांच्या कुंडलीत पाचव्या घरात आहे. या काळात तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळणार आहे. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. नोकरीच्या ठिकाणी उत्तम संधी मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्याही तुम्हाला फायदा होणार आहे. घरात सुख समृद्धी वाढणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीचे योग आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार 2024 पर्यंत गुरूचे मेष राशीत होणारे संक्रमण हे कर्क राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचं संक्रमण तुमच्या राशीच्या कर्म भावात होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात घवघवीत यश प्राप्त होणार आहे. नोकरदार लोकांना या काळात आर्थिक फायदा होणार आहे. या दरम्यान तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. तुमचा सन्मान वाढणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. सरकारी क्षेत्रात काम करताना शुभ वार्ता मिळणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ फलदायी असेल.
या राशीच्या लोकांसाठी सिंह राशीतील गुरूची भेट विशेष फलदायी ठरणार आहे. गुरुचं भ्रमण तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरात होणार आहे. अशा परिस्थितीत गुरु गोचर तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या कीर्ती आणि भाग्यात वृद्धी होणार आहे. याशिवाय धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. धार्मिक प्रवास तुम्हाला घडणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वासात वाढणार आहे. काही लोकांनाच्या करिअरसाठी गुरु गोचर भाग्यशाली ठरणार आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)