Surya Guru Yuti 2023 : तब्बल 12 वर्षांनी सूर्य-गुरूचा दुर्मिळ संयोग! 'या' राशींवर होणार पैशांचा वर्षाव

Sun And Jupiter Conjunction in Aries : ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात. 12 वर्षांनंतर, मेष राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग होणार आहे. याचा काही राशींवर अद्भूत परिणाम दिसून येणार आहे. 

Updated: Feb 13, 2023, 09:00 AM IST
 Surya Guru Yuti 2023 :  तब्बल 12 वर्षांनी सूर्य-गुरूचा दुर्मिळ संयोग! 'या' राशींवर होणार पैशांचा वर्षाव title=
guru gochar surya gochar 2023 rare conjunction of Sun-Jupiter after 12 years these zodiac get Money in marathi news

Surya Gochar Guru Gochar 2023 in mesh  :  ज्योतिषशास्त्रानुसार, बृहस्पति वर्षातून एकदा त्याची राशी बदलतो. सध्या देवगुरू बृहस्पति मीन राशीत आहे आणि 22 एप्रिल 2023 ला मेष राशीत प्रवेश करेल. त्याच वेळी, 15 एप्रिलला सूर्य देखील मेष राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे एप्रिल 2023 मध्ये सूर्य संक्रमण आणि गुरू संक्रमणामुळे मेष राशीमध्ये सूर्य-गुरू संयोग तयार होणार आहे. 12 वर्षांनंतर मेष राशीत सूर्य-गुरूचा संयोग काही राशींच्या लोकांसाठी छप्पड फाड यश घेऊन येणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात ज्ञान, धार्मिक कर्म आणि आनंद वाढेल. ते चांगले कर्म करतील आणि शुभ फळ मिळतील. (guru gochar surya gochar 2023 rare conjunction of Sun-Jupiter after 12 years these zodiac get Money in marathi news)

'या' राशी होणार मालामाल!

मेष (Aries)

सूर्य आणि गुरूचा संयोग मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम दिसून येणार आहे. या लोकांच्या आयुष्यात जबाबदाऱ्या वाढतील. कामाच्या ठिकाणी खूप चांगला काळ आहे. व्यवसायातही प्रगती होईल. सर्वांगीण लाभ होतील. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. आर्थिक बाजू मजबूत राहील. जोडीदारासोबत चांगले संबंध बनतील. 

मिथुन (Gemini)

सूर्य आणि गुरूच्या संयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येतील. विशेषतः करिअरसाठी चांगला काळ असेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते किंवा तुमची बदली तुमच्या इच्छित ठिकाणी होऊ शकते. छप्पर फाड पैसे मिळणार आहेत. व्यवसायात मोठी गोष्ट निश्चित होऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. 

तूळ (Libra) 
 

सूर्य आणि गुरूचा संयोग तूळ राशीच्या लोकांना जोरदार लाभ देईल. वैवाहिक जीवनात अडथळा आला असेल तर तो आता दूर होईल. कौटुंबिक जीवनात प्रेम वाढेल. व्यवसायात लाभ होईल. धनलाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरमध्ये कोणताही मोठा नफा किंवा यश मिळू शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)