Navpancham Yog: 100 वर्षांनी गुरु-केतूने तयार केला नवपंचम योग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Effect of Navpancham Yoga: गुरु आणि केतूमुळे तयार झालेला नवपंचम योग सिंह राशीमध्ये तयार झाला आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र या काळात काही राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी बदलू शकणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 14, 2024, 08:15 AM IST
Navpancham Yog: 100 वर्षांनी गुरु-केतूने तयार केला नवपंचम योग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता title=

Effect of Navpancham Yoga: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. गुरू 1 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश केल आहे. तर दुसरीकडे केतू 30 ऑक्टोबरपासून कन्या राशीत आहे. अशा स्थितीत हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या घरात आहेत, त्यामुळे नवमपंचम राजयोग तयार झाला आहे.

गुरु आणि केतूमुळे तयार झालेला नवपंचम योग सिंह राशीमध्ये तयार झाला आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र या काळात काही राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी बदलू शकणार आहे. या काळात काही व्यक्तींच्या करियरमध्ये बदल होणार आहे. जाणून घेऊया नवपंचम योगामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे. 

वृषभ रास (Taurus Zodiac)

नवपंचम योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. तसेच तुमच्या कृती योजना खूप यशस्वी होतील. व्यवसायात मोठे यश मिळू शकते.  या कालावधीत तुमची गुंतवणूक नफा देईल. पैसे कमावण्यासोबतच पैशाची बचत करण्यात यश मिळेल.

मिथुन रास (Mithun Zodiac)

नवपंचम योग तयार झाल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. नवीन गुंतवणुकीत नफा मिळेल. नवीन व्यवसायात यश मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. यावेळी तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. करिअरच्या आघाडीवरही तुम्हाला चांगले यश मिळेल.

मकर रास (Makar Zodiac)

नवपंचम योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमची संपत्ती वाढेल. मालमत्ता खरेदी करू शकता. वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला मोठा लाभ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळतील. कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. व्यापारी वर्ग आपला व्यवसाय वाढवू शकतो. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )