Guru Gochar 2023 : होळीनंतर 'या' राशींची संपत्ती वाढेल, वर्षभर प्रत्येक क्षेत्रात मिळणार भरभरून यश

Jupiter Transit 2023 : हे वर्ष अनेक राशींसाठी प्रगती आणि आर्थिक भरभराहट घेऊन आलं आहे. या वर्षाला सुरुवात होताच अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन सुरु झाल्यामुळे अनेक राशींवर या चांगला परिणाम दिसून येणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Updated: Jan 31, 2023, 11:38 AM IST
 Guru Gochar 2023 : होळीनंतर 'या' राशींची संपत्ती वाढेल, वर्षभर प्रत्येक क्षेत्रात मिळणार भरभरून यश
Guru Margi Gochar 2023 Effect After Holi wealth of these zodiac signs will increase and success in every field throughout the year marathi news

Jupiter Transit in Aries, Guru Gochar Effect : हिंदू धर्मात ग्रह ताऱ्यांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर पडतो. ज्योतिषशास्त्रात या ग्रहांमुळे आपल्या भविष्यात काय चांगल काय वाईट होणार याचे संकेत देण्यात येतात. या वर्षीच्या सुरुवातीला अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन सुरु झाले आहेत. अशातच होळीनंतर काही राशींवर भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये देवगुरु गुरु हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. त्याला वैभव, संपत्ती, संपत्तीचा ग्रह म्हटलं जातं. 

पंचांगनुसार होळी कधी आहे? (Holi 2023)

यंदा होळी ही 8 मार्च 2023 (Holi 2023) येणार आहे. होळीनंतर म्हणजेच 22 एप्रिल 2023 रोजी बृहस्पति मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे देवगुरु गुरु 12 वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश करणार असल्याने 12 वर्षांनंतर मेष राशीमध्ये गुरु आणि सूर्याचा संयोग होणार आहे. ही युती अनेक राशींसाठी अतिशय शुभ राहील. (Guru Margi Gochar 2023 Effect After Holi wealth of these zodiac signs will increase and success in every field throughout the year marathi news)

'या' राशींवर विशेष कृपा 

मेष  (Aries)

गुरुच्या एका राशीतून दुसऱ्या राशी जाण्यामुळे मेष राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. नोकरीदार वर्गातील लोकांना आनंदाची बातमी कळले. त्यांची पदोन्नती होईल. त्यांचा आयुष्यात सुख - समृद्धी वाढेल. 

सिंह (Leo)

गुरुचं संक्रमण हे सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर होणार आहे. त्यांचा आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं झीज होणार आहे. कारण या संक्रमणामुळे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात खूप मोठा फायदा होणार. नोकरीत प्रमोशन मिळणार आहे. 

मीन  (Pisces)

या राशीसाठी गुरुचं संक्रमण म्हणजे छप्पर तोड पैशांची बरसात असणार आहे. त्यांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. व्यवसायदारांसाठी मोठी संधी चालून येणार आहे. मोठा व्यवसाय करार निश्चित होण्याची शक्यता आहे. 

मीन राशीतील देवगुरु बृहस्पति मार्गी : (Guru Margi Gochar 2023)

देव गुरु बृहस्पति 13 एप्रिल 2022 ला मीन राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर 24 जुलै 2022 ला तो मीन राशीतून मागे सरकतो. त्यानंतर गुरु पुन्हा एकदा 24 नोव्हेंबर 2022 ला मीन राशीत गेला होता. पुढे तो 24 नोव्हेंबरच्या पहाटे 4.27 पासून मीन राशीत सरळ रेषेत फिरत आहे. मेष राशीत प्रवेश करण्यापूर्वी तो 22 एप्रिल 2023 पर्यंत येथून मार्गक्रमण करेल.