Guru Pushya Yoga 2023 : गुरुपुष्यमृत योगामुळे तुम्हाला लागणार बंपर लॉटरी? विष्णू-लक्ष्मी कृपेने होऊ शकता श्रीमंत

Guru Pushya Yoga 2023 : पुढचे काही दिवस 12 राशींवर शुभ आणि चांगले दिवस घेऊन आले आहे. काही शुभ योगामुळे तुम्ही गडगंज श्रीमंत होण्याची संधी आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 24, 2023, 09:57 AM IST
Guru Pushya Yoga 2023 : गुरुपुष्यमृत योगामुळे तुम्हाला लागणार बंपर लॉटरी? विष्णू-लक्ष्मी कृपेने होऊ शकता श्रीमंत  title=
guru pushya amrut rajyog makes these zodiac signs Get Huge Money Astrologer Predicts Horoscope

Guru Pushya Yoga 2023 : मे महिन्या संपण्यासाठी अवघे काही दिवस असताना या महिन्यातील एकमेव दुर्मिळ योगामुळे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात जसं ग्रह गोचरला महत्त्व आहे. तसंच नक्षत्रालाही तेवढंच आहे. अतिशय शुभ आणि दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे गुरुपुष्यमृत योगसोबत चार राजयोगसुद्धा तयार झाले आहे. या योगांमुळे काही राशींच्या नशिबात पैसाच पैसा बरसणार आहे. 

कधी आहे गुरुपुष्यमृत योग?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुष्य नक्षत्र योग हा 25 मे 2023 ला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येतं त्याला गुरु पुष्य योग असं म्हणतात. हा दुर्लभ गुरु पुष्य योग तयार होतो. गुरु पुष्य योगाला गुरु पुष्य नक्षत्र योग असेही म्हणतात. हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी असतो. सूर्योदयापासून ते संध्याकाळी 5 वरून 54 मिनिटांपर्यंत हा राजयोग असणार आहे. (guru pushya amrut rajyog makes these zodiac signs Get Huge Money Astrologer Predicts Horoscope)

25 मे रोजी गुरु पुष्यासह 5 शुभ योग!

25 मे रोजी गुरु पुष्य योगासह 5 शुभ योग तयार होत आहेत. वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवियोग जुळून आले आहेत. 

'या' राशींना लागणार बंपर लॉटरी? 

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य अमृत योग अतिशय शुभ ठरणार आहे. व्यवसायिकांसाठी चांगले दिवस सुरु होणार आहे. नोकरदार वर्गासाठीही हा उत्तम काळ असणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळणार आहे. धनलाभाचेही शुभ संकेत मिळत आहे. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. राजकारणापासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. रखडलेली कामं सहज पूर्ण होणार आहे. सर्वत्र आनंद आणि यश मिळणार आहे. अनेक मोठ्या जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. उत्साही आणि आनंदी राहणार आहात. 

कन्या (Virgo)

या राशीसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. आयुष्यातील छोटे वादळ काही क्षणात निघून जातील. महत्त्वाचे निर्णय घेताना कठीण वाटेल पण योग्य निर्णय तुम्ही घ्या. कुटुंबातील लहान सहान वादावर तुम्ही तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. शत्रूंनी कितीही कटकारस्थान केलं तरीही तुम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)