Holika Dahan 2023 Upay in Marathi: रंगाची उधळण आणि पुरण पोळीचा सुंगध...अशा या होळीची लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे जण वाट पाहत असतात. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्रात होलिका दहन 6 मार्चला आणि 7 मार्चला रंगांची उधळण केली जाणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये होलिका दहन 07 मार्चला होणार असून, 8 मार्चला होळी साजरी होणार आहे. होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. तर रंगांचा सण होळी हा चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला साजरा होता. हा सण तुमच्यासाठी लक्ष्मीची कृपा घेऊन आला आहे. (holi 2023 Upay or Remedies buy these silver coin silver ring Wealth will always remain in the house money in marathi)
ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही आर्थिक अडचणीचा सामना करत असाल तर होळीचा सण तुमच्या समस्येवर मात करेल. कायम तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा राहिल. जोतिषशास्त्रात होळीच्या दिवशी काही उपाय सांगण्यात आले आहे. ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद आणि रोगांपासून मुक्ता मिळवता येते. शास्त्रानुसार होळीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी चादीचं नाणं खरेदी करा. त्यानंतर एका पिवळ्या कपड्यामध्ये हे नाणं हळदीने बांधून ठेवा. त्यानंतर ही पोटली देवघरातील लक्ष्मीच्या जवळ तिची स्थापना करा. याशिवाय होलिका दहनाची राख एका डब्यात ठेवून ती घरातील तिजोरीत किंवा कपाटमध्ये ठेवा. हा उपाय केल्यास तुम्हाला कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.
होळीच्या दिवशी चांदीची अंगठी खरेदी करा. त्यानंतर त्या अंगठीची विधिवत पूजा करा आणि ती अंगठी गळ्यात घाला. हा उपाय केल्यामुळे तुमचं नशीब चमकतं आणि तुम्हाला धनलाभ होतो.
होळीच्या दिवशी विवाहित स्त्रीयांनी चांदीचे जोडवे खरेदी करावे. ही चांदी जोडवी दुधाने धुवा आणि विवाहित स्त्रीला भेट म्हणून द्या. याशिवाय तुम्ही स्वतःही ही जोडवी घालू शकता. जोडवीचा हा उपाय तुम्हाला धनवान बनवले. त्याशिवाय ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी चांदीची भांडी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)