Horoscope 24 March 2024 : होळीचा आजचा दिवस कोणासाठी होणार पुरणपोळीसारखा गोड? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Holi Horoscope 24 March 2024 : आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीचा सण...आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योगसह धनशक्ती योग असल्याने होळीचा दिवस तुमच्यासाठी पुरणपोळीसारखा गोड होणार का? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

नेहा चौधरी | Updated: Mar 24, 2024, 08:18 AM IST
Horoscope 24 March 2024 : होळीचा आजचा दिवस कोणासाठी होणार पुरणपोळीसारखा गोड? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
Holi rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 24 march 2024

Holi Horoscope 24 March 2024 : आजचा दिवस अतिशय खास आहे. आज वाईटावर चांगला विजयाचा उत्सव आहे. नकारात्मक गोष्टी आणि विचार, मत्सर, द्वेष होलिका दहनाच्या अग्नीत भस्म करावं. पंचांगानुसार आज सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योगसह धनशक्ती योग जुळून आला आहे. अशा या होळीच्या शुभ मुहूर्ताचा दिवस कोणासाठी पुरणपोळीसारखा गोड होईल, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य ज्योतिषी प्रितिका मजुमदार यांच्याकडून... (Holi rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 24 march 2024)

Add Zee News as a Preferred Source

मेष (Aries Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. शेअर बाजारात लाभ होईल. मात्र आर्थिक समस्या निर्माण होईल. व्यवहारात काळजी घ्याच. अपघात होण्याची शक्यता आहे. नवीन कामात यश मिळेल. प्रकृतीत सुधारणार होणार आहे. 

आजच मंत्र - "ॐ कलीं रामाय नमः"

वृषभ (Taurus Zodiac) 

आज तुम्हाला सरकारी मदत मिळणार आहे. तुमचे अडकलेले कामं पूर्ण होणार आहे. अध्यात्मात रस वाढणार आहे. आर्थिक व्यवहारात फायदा होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. जोडीदाराच्या प्रगतीमुळे सामाजिक सन्मान वाढणार आहे. 

आजचा मंत्रा - "ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः"

मिथुन (Gemini Zodiac)

तुमची आजची योजना फलदायी ठरणार आहे. आज तुमची कामं मार्गी लागणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. आत्मविश्वास वाढ होणार आहे. प्रवास करताना काळजी घ्या. घाईघाईने आणि निष्काळजीपणे काम करण्याची प्रवृत्ती तुम्ही थांबवा. 

आजचा मंत्रा - "ॐ चं चन्द्रमसे नमः"

कर्क (Cancer Zodiac)   

आज थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरणार आहे. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू करणे तुम्हाला घातक ठरेल. प्रवासातून यश मिळणार आहे. लाभाच्या संधी वाढणार असून जोखीम मात्र घेऊ नका. घरासंबंधी समस्या उद्भवणार आहे. सर्जनशील कामाचं फळ मिळणार आहे. 

आजचा मंत्रा - "ॐ श्री सूर्य नारायणाय नमः"

सिंह (Leo Zodiac) 

आज अनावश्यक खर्च होणार आहे. काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आज जरा तणाव जाणवणार आहे. वादाला प्रोत्साहन देऊ नका. धोकादायक आणि जोखमीची कामं टाळा. आर्थिक स्थिती कमकुवत होईल. 

आजचा मंत्रा - " ॐ नमः शिवाय नमः"

कन्या (Virgo Zodiac)    

आज वेळेचा सदुपयोग करा. नवीन कपडे आणि दागिने खरेदी करणार आहात. नोकरीत प्रगती होणार आहे. प्रवास यशस्वी होणार आहे. आनंद कायम राहणार आहे. तुम्ही तुमच्या व्यसनांवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला जास्त मेहनत करावे लागणार आहे.  

आजचा मंत्रा - "ॐ श्री राजीव लोचोनाय नमः"

तूळ (Libra Zodiac)  

आज आत्मविश्वास वाढणार आहे. जुने मित्र आणि नातेवाईक भेटल्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. व्यवसाय चांगला होणार आहे. व्यवसाय चांगला चालणार आहे. कौटुंबिक वातावरण अनुकूल असणार आहे. 

आजचा मंत्रा - "ॐ कलीं मधुसूदनाय नमः"

वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आज प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. मेहनतीला यश मिळणार आहे. व्यवसाय चांगला आणि सुरळीत चालणार आहे. नवीन योजना राबविण्यात यश मिळणार आहे. आळस झटकून द्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

आजचा मंत्रा - "ॐ कलीं केशवाय नमः"

धनु (Sagittarius Zodiac) 

आज तुम्हाला दु:खद बातमी मिळण्याची शक्यता आहे. आजूबाजूला अधिक धावपळ होणार असून थकवा जाणवणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. पालकांचे आरोग्य चांगले राहणार आहे. दिवस आनंदात असणार आहे. व्यवसायात लाभदायक परिस्थिती असेल.

आजच मंत्र - "ॐ शं शनैश्चराय नमः" 

मकर (Capricorn Zodiac)   

आज तुम्ही पार्टी आणि पिकनिकचा आनंद घेणार आहे. बौद्धिक कार्य यशस्वी होणार आहे. दिवस प्रतिकूल असणार आहे. सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठेतील बदलामुळे चिंतेत असणार आहात. वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे. 

आजच मंत्र - "ॐ शं शनैश्चराय नमः" 

कुंभ (Aquarius Zodiac) 

आज कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. प्रॉपर्टीचे मोठे करार होणार असून मोठा फायदा होणार आहे. निष्काळजीपणा टाळा. दूरदृष्टी आणि हुशारीने अनेक प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात योग्य निर्णय न घेतल्याने नुकसान होणार आहे. 

आजचा मंत्रा - "ॐ सों सोमाय नमः"

मीन  (Pisces Zodiac)  

तुम्हाला आज सरकारी मदत मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे. थकवा जाणवणार आहे. आज वाद टाळा. नवीन कामात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाची प्रगती होणार आहे. 

आजचा मंत्रा - "ॐ कलीं कृष्णाय नमः"

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More