Horoscope 04 March 2022 : शुक्रवार या राशीच्या लोकांच नशीब फळफळणार, कामात यश

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस? या राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार  

Updated: Mar 4, 2022, 07:58 AM IST
Horoscope 04 March 2022 : शुक्रवार या राशीच्या लोकांच नशीब फळफळणार, कामात यश title=

मेष : शुक्रवारी तुमच्या परिवाराला सुख मिळेल. खास व्यक्तीची भेट होणार आहे. कामात उत्तम संधी मिळेल. अचानक खर्च वाढू शकतात. इच्छेनुसार कार्य घडतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 

वृषभ :शुक्रवारी तुमचा दिवस शुभ असेल. आई-वडिलांकडून स्नेह मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. दिवस आनंददायी असेल. फक्त तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सतर्क राहा. वरिष्ठांचा सल्ला घ्या.

मिथुन : शुक्रवारी चतुराईने काम करा. यश तुमच्याकडे पाणी भरेल. कौटुंबिक सुख मिळेल. भरपूर मनोरंजन मिळेल. उत्साह आणि जोश कायमच राहिलं. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहाल. कामात आज यश मिळेल. शुक्रवारी प्रशंसा कानी पडेल. प्रकृती सामान्य असेल. 

कर्क : आजचा शुक्रवार तुमच्यासाठी आनंददायी असेल. विद्यार्थांसाठी चांगला दिवस आहे. कुटुंबाकडून आनंद मिळेल. तुम्ही प्रसन्न राहा. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळणार आहे. 

सिंह : शुक्रवार या राशींच्या लोकांकरता प्रसन्नता घेऊन येईल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला मेहनत आणि कष्टाचं फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती देखील उत्तर राहिल. ज्ञान, पैसा आणि उत्तम विचार अशी सांगड असलेला आजचा दिवस आहे. 

कन्या : या शुक्रवारी व्यापारी वर्गाला यश प्राप्त होईल. धनलाभ मिळेल. कार्यात चांगली प्रगती कराल. कामात यश मिळेल. दिवस उत्तम असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. अचानक प्रवास होईल. 

तूळ : आज दिवस तणावपूर्ण असेल. तुमच्या स्वभावात गंभीर आणि  एकाग्रता दिसून येईल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. अचानक प्रवास होईल. व्यापारी वर्गाला विशेष लाभ मिळेल. 

वृश्चिक : उत्साहाने भरलेला आजचा शुक्रवार असेल. विद्यार्थांसाठी चांगला दिवस आहे. कुटुंबाकडून प्रत्येक कामात योग्य सहकार्य मिळेल. भाग्य तुमच्यासोबत असेल. मंगल कार्य आज घडणार. वरिष्ठांकडून आज प्रशंसा होईल. दाम्पत्यासाठी आजचा दिवस महत्वाचा. 

धनू : तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली होईल. अचानक धन लाभ होवू शकतो. गुंतवणुकीच्या दिशेने वाटचाल कराल. विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 

मकर : आजचा दिवस असेल खास. नोकरदार लोकांसाठी वेळ अनुकूल नाही. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना काळजी घ्या. संवाद साधा आणि स्वतःला आराम करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुमच्या कामामुळे तुमच्या कौटुंबिक वेळेत अडथळा येऊ देऊ नका.

कुंभ : तुमच्या समवयस्क गटात तुमची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी सुरळीत राहतील आणि तुमची चांगली प्रगती होईल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे नवीन मार्गही सापडतील.

मीन : साहित्य, कला, लेखन, संगीत, चित्रपट किंवा क्रीडा यांसारख्या सर्जनशील क्षेत्रांशी संबंधित लोकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. फायदेशीर सौदे होऊ शकतात. तुम्ही स्वत:साठी प्रसिद्धी देखील मिळवू शकाल.