मुंबई: व्यापारी वर्गासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी रविवारचा दिवस फायदेशीर असणार आहे. कामासाठी रविवारचा दिवस चांगला असेल. ऊर्जा चांगली असणार आहे. कुटुंबातील वातावरण चांगलं असेल. 12 राशींसाठी कसा असणार रविवारचा दिवस खगोल गुरु बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊया.
मेष: नशीब खूप साथ देणार आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता. कामाच्या ठिकाणी फायदा होणार. शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल.
वृषभ: आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं राहील. कुटुंबात सुख आणि शांती राहील.
मिथुन: दिवसाची सुरुवात प्रसन्न मनाने होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्य चांगंल राहील. व्यावसायिकांना फायदा होईल.
कर्क: कामाच्या ठिकाणी चांगले फळ मिळेल. पैसा चांगल्या ठिकाणी खर्च होईल. विद्यार्थ्यांच्या मनात भीती असेल. हाती घेतलेलं काम पूर्ण होईल.
सिंह: तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रविवार व्यावसायासाठी चांगला असेल. नशीब तुमची साथ देईल.
कन्या: रविवारी तुम्हाला अस्वस्थ वाटेल, तुमचे खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचे कारण असेल. कामाच्या ठिकाणी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल.
तुळ: आर्थिक व्यवहार करणं टाळा, जर केलेच तर विशेष काळजी घ्या. मन प्रसन्न राहील. तुम्ही उत्साहाने परिपूर्ण दिसाल, नशीब तुमची साथ देईल.
वृश्चिक: व्यावसायासाठी चांगली स्थिती असणार आहे. तुम्ही कामात तुमचे सर्वोत्तम द्याल. तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचं कौतुक देखील होईल.
धनु: कोर्टाच्या कामात व्यस्त व्हाल. कामात चांगलं यश मिळेल. मेहनत आणि भाग्य दोन्ही साथ देईल.
मकर: आपलं आरोग्य बिघडण्याचे संकेत आहेत. त्यामुळे विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आपण स्वस्त राहाल मात्र त्याचा फायदा होईल. आर्थिक स्थिती ठिक राहील.
कुंभ: कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यावर भर द्या. व्यस्त शेड्युलमधून वेळ काढणं खूप महत्त्वाचं असणार आहे. आपल्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल.
मीन: पूर्ण दिवस उत्साहानं भरलेला राहील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. दिवस संमिश्र असेल. कोणतीही गोष्ट करताना लक्षपूर्वक करा.