Horoscope : 11 ऑक्टोबरपासून बदलणार या राशींचं नशीब

11 ऑक्टोबरपासून काही राशींचं भाग्य बदलणार आहे. 

Updated: Oct 9, 2021, 10:46 PM IST
Horoscope : 11 ऑक्टोबरपासून बदलणार या राशींचं नशीब title=

मुंबई: शनी देव ज्याला न्यायाची देवता म्हटले जाते, ते कर्माच्या आधारे न्याय देतो. ज्यांच्यावर ते प्रसन्न आहेत, ते त्याला एका क्षणात राजा बनवू शकतात आणि ज्यावर शनी रागवला त्याचे ग्रह फिरतात असं म्हणण्याची परंपरा आहे. 11 ऑक्टोबरपासून काही राशींचं भाग्य बदलणार आहे. कोणत्या राशी आहेत ज्यांचासाठी आठवडा चांगला असेल जाणून घेऊया.

मेष: पार्टनरसोबत आपण वेळ घालवाल. कौटुंबिक जीवन आनंद देणार असणार आहे. कामाच्या ठिकाणी आपल्याला यश मिळेल. विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. आपल्याला येत्या आठवड्यात धन-लाभ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आपली आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. मित्र-परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकता. 

कर्क: आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. नवीन कोणतं काम करण्याचा विचार असेल तर ते येत्या आठवड्यात करून टाका. त्याचा फायदा आपल्याला मिळणार आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी आहे. गाडी खरेदी करण्याचा योग आहे. आर्थिक बाजू येणाऱ्या आठवड्यात मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. 

कन्या: नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. प्रतिष्ठा वाढेल त्यामुळे आपलं कौतुक होईल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. 

(टीप: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. झी 24 तास त्याची पुष्टी करत नाही.)