राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नशिबाची साथ

पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस   

Updated: Jul 11, 2020, 07:40 AM IST
राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नशिबाची साथ

मेष - आज कोणत्या गोष्टीचा विचार करत असाल तर धिर ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नवीन गोष्टी करण्यासाठी वरिष्ठांकडून सल्ला घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. 

वृषभ - तुमच्या राशीसाठी आज चंद्राची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते.  व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. 

मिथुन - आज तुम्ही एखादे काम कोणत्याही परिस्थितीत पार पाडालच. कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी इतरांवर प्रभाव पाडाल. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.

कर्क - तुम्हाला तुमचे निर्णय स्वतःला घ्यायला आवडतात आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. तुमच्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक करण्याची उमेद आहे. अधिक मेहनत करा यश अटळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.  

सिंह - कित्येक विचारांनी तुमच्या डोक्यात घोळ घातला आहे. कालांतराने सर्व गोष्टी मार्गी लागतील. फक्त योग्य वेळेचा विचार करा. लवकरच ती वेळ तुमच्या जीवनात येणार आहे. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत रहा.

कन्या - आज कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत ठेवू नका. तुम्हाला वाटल्यास ती माहिती इतरांना सांगा. स्वतःहून कोणताही निर्णय घेवू नका. इतरांचा सल्ला घ्या. 

तूळ- नोकरीत एखादा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल. जबाबदारी घ्यावी लागेल. 

वृश्चिक-  आज तुम्ही एखादे काम कोणत्याही परिस्थितीत पार पाडालच. कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी इतरांवर प्रभाव पाडाल. 

धनु- कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामे मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता. आर्थिक आवक वाढेल. प्रगतीचे नवे मार्ग दृष्टीपथात येतील. 

मकर- आजचा दिवस खूप बिझी असेल. इतरांसमोर स्वत:ची बाजू स्पष्टपणे मांडा. ऑफिसमध्ये कामाची तपासणी होऊ शकते. परिस्थिती तुमच्यासाठी अनुकुल ठरेल. 

कुंभ- तुमच्या राशीसाठी आज चंद्राची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते. 

मीन- अचानक धनलाभ होईल. अडकलेले पैसेही परत मिळतील. मित्रांना मदत करण्यासाठी तयार राहा. कोणासोबत कोणताही वाद असल्यास तो मिटवण्याचा प्रयत्न करा.