Horoscope 2024 : 'या' लोकांचं भाग्य 2024 चमकणार, 2025 पर्यंत शनी-राहू-गुरू देणार बंपर लाभ

Shani Rahu Guru Positive Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि, राहू आणि गुरु हे अतिशय महत्त्वाचं ग्रह मानले जातात. हे ग्रह शुभ स्थितीत असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि समृद्धी नांदते. नवीन वर्ष 2024 ते 2025 या काळात हे तीन ग्रह काही राशींना बंपर लाभ देणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Dec 8, 2023, 11:02 PM IST
Horoscope 2024 : 'या' लोकांचं भाग्य 2024 चमकणार, 2025 पर्यंत शनी-राहू-गुरू देणार बंपर लाभ  title=
Horoscope 2024 Fortune of these people will shine in 2024 Shani Rahu Jupiter will give bumper benefits till 2025

Shani Rahu Guru Positive Effect : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली स्थिती बदलतो. ग्रह हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या ग्रहांच्या स्थिती बदलामुळे त्याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांवर पडत असतो. येणारं नवीन वर्ष 2024 मध्ये काही राशींसाठी शनि, राहू आणि गुरूची स्थिती भाग्यशाली ठरणार आहे. या ग्रहांचा परिणाम नवीन वर्षात 2024 मध्येच नाही तर 2025 पर्यंतमध्येही काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. संपत्ती, यश आणि प्रगती या लोकांच्या घराचे दार ठोठवणार आहे.  2024-25 पर्यंत गुरु, शनि आणि राहू कोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे जाणून घेऊया. (Horoscope 2024 Fortune of these people will shine in 2024 Shani Rahu Jupiter will give bumper benefits till 2025)

'या' राशींचं नशीब 2024-25 मध्ये चमकणार!

मेष रास (Aries Zodiac) 

या तीन ग्रहांची शुभ स्थिती या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. 2024 मध्ये गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत गोचर करणार आहे. नशीब या लोकांना प्रत्येक पावलावर साथ देणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे. पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग निर्माण होणार आहे. व्यवसायात मोठा नफा होणार आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याचे योग आहेत. मात्लर लपलेल्या शत्रूंपासून सावध राहणं गरजेचं आहे.

वृषभ रास (Taurus Zodiac) 

वर्ष 2024 - 2025 पर्यंत वृषभ राशीच्या लोकांनाही भरपूर लाभ घेऊन येणार आहे. शनिदेव करिअरमध्ये एकामागून एक मोठी प्रगती घेऊन येणार आहे. तुम्हाला अनेक मोठ्या जबाबदाऱ्या मिळणार आहे. जे तुम्ही यशस्वीपणे पूर्णही करणार आहात. उत्पन्नाचं नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. अचानक आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळणार आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांना 2024 - 2025 मध्ये लाभ मिळणार आहे. व्यवसायात मोठे यश प्राप्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्या आता सुटणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुम्ही कर्जातून मुक्त होणार आहात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे. धार्मिक प्रवासाला जाणार आहात. परदेश प्रवासाचे योग आहेत. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Lakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)