Horoscope २२ फेब्रुवारी २०२२ : मंगळवारी 'या' राशीच्या लोकांना मिळणार यश

असा असेल आजचा दिवस, काही राशींनी घ्यावी विशेष काळजी 

Updated: Feb 22, 2022, 08:22 AM IST
Horoscope २२ फेब्रुवारी २०२२ : मंगळवारी 'या' राशीच्या लोकांना मिळणार यश  title=

मुंबई : मंगळवारचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी असणार खास. सिंह राशीच्या लोकांना लांबच्या प्रवासाचा योग आहे. तर तूळ राशीच्या लोकांना चारही बाजूंनी यश प्राप्त होणार आहे. 

मेष : मंगळवारचा दिवस काही लोकांसाठी असेल खास. नियमित काम करणं कायम फायदेशीर राहिलं. व्यवसायिकांना आजचा दिवस निराशेचा असेल. नोकरदार वर्गाकरता मंगळवार आरामदायी असेल. 

वृषभ : मंगळवारी कुटुंबात अस्थिरता निर्माण होईल. आई-वडिलांच्या विचारात मतभेद असतील. प्रेमसंबंधांकरता आजचा शुभ असेल. नोकरदार वर्गाने आजच्या दिवशी अधिक कष्ट करावे. 

मिथुन : मंगळवारी तुमच्या मोठ्या व्यक्तींसोबत गाठीभेटी वाढतील. आजचा दिवस प्रगतीच्या दृष्टीकोनातून चांगला आहे. आज तुमची जीवनशैली सुधारणार आहे. 

कर्क : कर्क राशीच्या लोकांना वेगवेगळ्या स्तरावर समस्यांना सामोरं जावं लागेल. वेळेत काम पूर्ण करण्याची सवय लावा. 

सिंह : मंगळवारी सांधे दुखीचा त्रास जाणवेल. वरिष्ठ नागरिकांसाठी आजचा दिवस भावनात्मक असेल. कुटुंबात आज खूप मोठे बदल होतील. 

कन्या : मंगळवारी काही बाबतीत आर्थिक आणि व्यावसायिक रुपात मोठा बदल होईल. आजचा दिवस सुखद असेल. आत्मविश्वास आणि विश्वासाने भरलेला आजचा दिवस असेल. 

तूळ : मंगळवारचा दिवस या राशीसाठी खास असेल. चतुराईने वागल्यास यश तुम्हाला मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची विशेष काळजी घ्या. 

वृश्चिक : मंगळवारी यश प्राप्त होईल. प्रसिद्धीकरता आजचा दिवस महत्वाचा असेल. आरोग्य उत्तम राहिल. आत्मविश्वास वाढेल. 

धनू : आजचा दिवस कुटुंबासाठी द्या. आपल्या माणसांची जाणीव होईल. श्रमदान श्रेष्ठ दान ठरेल. लक्ष्य गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल. 

मकर : मकर राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्या. भाग्योदय होईल. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस असेल खास. विदेश दौऱ्याची संधी मिळेल. 

कुंभ : आजचा दिवस आर्थिक उत्पानाचा असेल. सन्मान वाढेल. व्यापारात भर होईल. धनलाभाचा दिवस. जोडीदाराकडून आनंद मिळेल. 

मीन : आजचा दिवस चिंतेत असेल. अनावश्यक गोष्टी टाळा. काही लोकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. ज्येष्ठ लोकांना आजचा दिवस महत्वाचा.