Horoscope 23 October 2021 | शनिवार आर्थिक सुबत्ता आणणार...तरुणांसाठी नोकरीच्या संधी मिळणार

शनिवार (Horoscope 23 October 2021)  तुमच्यासाठी कसा राहील, जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे सुपूत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. 

Updated: Oct 22, 2021, 09:40 PM IST
Horoscope 23 October 2021 | शनिवार आर्थिक सुबत्ता आणणार...तरुणांसाठी नोकरीच्या संधी मिळणार

मुंबई : शनिवारी आर्थिक स्थिती मजबूत होईल. सॉफ्टवेयर कंपनीत काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहिल. घाऊक व्यापाऱ्यांनी शनिवारी व्यवहार करणं टाळावे. तरुणांनी पालकांच्या सूचनांचे पालन करावं. शनिवार (Horoscope 23 October 2021)  तुमच्यासाठी कसा राहील, जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे सुपूत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Horoscope 23 October 2021 know astrology prediction leo vigro libra all zodiac signs)

मेष (Aries) : दिवसाची सुरुवात संथ राहिल. कार्यक्षेत्रातील तुमचे प्रयत्नांना ओळखले जातील. वित्त संबंधित बाबींमध्ये काळजी घ्यावी लागेल. घाऊक विक्रेत्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात माल टाकू नये.

वृषभ (Taurus) : सवयीत बदल केल्यास दिवस चांगला राहिल. जुन्या गुंतवणुकीतून मिळालेल्या पैशाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. परमेश्वराची उपासनेत मन लागेल. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणासह प्रणय असेल.

मिथुन (Gemini) : शनिवार आयुष्यात सोनेरी क्षण आणणार आहे. बुद्धिमत्तेने केलेले काम पूर्ण होईल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही घरातील सदस्यांशी बसून चर्चा कराल. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे.

कर्क (Cancer) : इतरांना त्यांचे विचार व्यक्त करण्यापासून रोखू नका. आपली गुणवत्ता सतत सुधारण्यासाठी प्रयत्नशील रहा. लेखकांना चांगली बातमी मिळू शकते. वेळेचा पुरेपूर वापर करा आणि वाईट संगती टाळा. तरुणांनी पालकांच्या सूचनांचे पालन केले पाहिजे.

सिंह (Leo) : तुमची वाणी तुमचं वरदान आहे. कपड्यांच्या व्यापाऱ्यांसाठी हा निराशेचा दिवस ठरू शकतो. झटपट नफा मिळवण्याच्या प्रयत्नात चुकीच्या पद्धतींचा अवलंब करू नका. कौटुंबिक समस्या सुटतील. स्त्रिया घर स्वच्छ करण्यात व्यस्त असतील.

कन्या (Virgo) : स्वत:ला बदलासाठी तयार ठेवा. वर्क फॉर्म करणाऱ्यांनी परिपक्वतेनी आणि गांभीर्याने काम करावं. व्यवहारात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधार होण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित समस्या दूर होतील.

तुळ (Libra) : तुम्हाला तुमची प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर काही प्रकरणांमध्ये दिलासा मिळेल.

वृश्चिक (Scorpio) : कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. भेटवस्तू आणि सन्मानाचा लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आर्थिक संकट टाळण्यासाठी फालतू खर्च थांबवावा लागेल. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही.

धनु (Sagittarius) : तुमच्या विचारांमध्ये बदल दिसेल. व्यवसाय योजना उत्साहाने पूर्ण कराल. जुनी गुंतवणूक चांगली परतावा देण्याची शक्यता आहे. वैवाहिक चर्चेत यश मिळेल.

मकर (Capricorn) : व्यवसायात पूर्वीची कामे मार्गी लावण्यासाठी वेळ चांगला आहे. तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना बनवू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

कुंभ (Aquarius) : उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आकस्मिक कामाच्या आगमनामुळे नियोजित योजनांमध्ये बदल करावे लागतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देण्याचे वचन देऊ शकता.

मीन (Pisces) : शनिवार आनंददायी असेल. पैशासंदर्भात अनेक प्रकारचे विचार मनात येऊ शकतात. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन मार्गांचा विचार करा. मौल्यवान वस्तू खरेदीसाठी वेळ अनुकूल राहील. अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात.