राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींच कौटुंबिक स्वास्थ बिघडणार

असा असेल आजचा दिवस 

Updated: Apr 23, 2020, 07:21 AM IST
 राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींच कौटुंबिक स्वास्थ बिघडणार  title=

मेष - काही कामात अडचण निर्माण होऊ शकते. आगामी काळात जास्त मेहनत घ्यावी लागेल. जॉन बदलण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबाव लागेल. सगळीकडे एक नकारात्मकता आहे. यामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराची साथ लाभेल. 

वृषभ - व्यवसायात आगामी काळात खूप मोठा फायदा होणार आहे. नोकरदार वर्गासाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. जोडीदाराकडून या काळात मदत मिळेल. अविवाहित लोकांची लवलाईफ चांगली असेल. 

मिथुन - नक्षत्रांची स्थिती ही मिथुन राशीकरता खास आहे. नवीन जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील. कौटुंबिक स्वास्थ बिघडणार आहे. काळजी घ्या. 

कर्क - घरच्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. या मंडळींना तुम्ही इम्प्रेस करू शकाल. नोकरी बदलण्याचा विचार सध्या तरी करू नका. अपघातामुळे त्रास होतो. त्याची काळजी घ्या. 

सिंह - आगामी काळात अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात सावधानराहा. कौटुंबिक स्वास्थ बिघडणार आहे. यासाठी शांत राहण हेच महत्वाचं ठरणार आहे. 

कन्या - व्यवसाय आणि नोकरी यामध्ये आगामी काळात खूप मोठे बदल होणार आहेत. प्लानिंग महत्वाचं ठरणार आहे. जोडीदारासोबत वेळ घालवा. 

तूळ - काही रखडलेली काम आता या लॉकडाऊनमध्ये पूर्ण कराल. व्यवसायात प्रगती होणार आहे. विवाहितांसाठी आताचा काळ कठिण आहे. 

वृश्चिक - व्यवसायात फायदे होऊ शकतात. नोकरदार वर्गासाठी काळ चांगला असला तरीही आगामी काळात काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक स्वास्थ बिघडणार आहे. 

धनू - नोकरदार वर्गाची अनेक काम रखडली जाणार आहे.लवलाईफमध्ये काही बदलण होणार आहे. अविवाहितांसाठी हा काळ चांगला आहे. 

मकर - जुनी दुखणी बंद होतील. स्थिती अनुकूल आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. त्यामुळे शांत राहा. 

कुंभ - करिअरकरता कुंभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला आहे. धन लाभ आगामी काळात होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन - अचानक लाभ होणार आहे. जोडीदाराची साथ लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. जुने कर्ज संपवू शकता.