Horoscope 24 September: मीनसह या राशीच्या लोकांना मिळणार रोजगाराच्या संधी

येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी दु:खाचा डोंगर. 12 राशींसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस.

Updated: Sep 23, 2021, 11:01 PM IST
Horoscope 24 September: मीनसह या राशीच्या लोकांना मिळणार रोजगाराच्या संधी title=

मुंबई: येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी दु:खाचा डोंगर. 12 राशींसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस. कोणत्या राशींना मिळणार शुभ वार्ता आणि कोणाला राहावं लागणार सतर्क जाणून घेऊया. 

मेष: शुक्रवारी मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धाडस दोन्ही गोष्टी अति प्रमाणात असतील. नव्या जबाबदाऱ्या मिळतील. कठीण समस्या, अडचणींचं समाधान मिळेल. 

वृषभ: महिलांसाठी शुक्रवार शुभ असणार आहे. ऊर्जेनं भरलेला दिवस असणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात फायदा होणार आहे. 

मिथुन: सर्व स्तरातून शुक्रवारी या राशीच्या व्यक्तींची स्तुतीच होईल. जर महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते शुक्रवारी पूर्ण करा. तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करू शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

कर्क: दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. व्यवसायाचा विचार करणाऱ्यांसाठी शुक्रवार उत्तम दिवस असेल. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. कामाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

सिंह: व्यवसायासाठी उत्तम दिवस आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते.

कन्या:  धैर्याने नवीन आव्हानांचा सामना करा, मार्ग सोपा होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित काम होईल. महिलांसाठी शुक्रवारचा दिवस उत्तम आहे. 

तुळ: नवीन ध्येय सेट करा. कोणतंही काम करता मन शांत ठेवा त्याचा फायदा होईल. 

वृश्चिक: संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीच्या मदतीने अवघड कामे सुद्धा सहज पूर्ण होतील. व्यवसायात नफ्याच्या संधी मिळतील. 

धनु: बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत चांगल्या ऑफर मिळू शकतात. आपला मुद्दा इतरांसमोर नीट मांडा.

मकर: आत्मविश्वास आणि मेहनीत यामुळे त्यांचं लक्ष मिळवता येईल. नोकरीच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. 

कुंभ: तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. व्यावसायिकांसाठी शुक्रवार लाभदायक ठरेल. शुक्रवारी आपला खर्च देखील तेवढाच होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मीन: नव्या संधी मिळतील. सरकारी कामात पैसे गुंतण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल.