मुंबई : Horoscope 24th February 2022 : सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुवारी बचत योजनेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे. ज्योतिषी बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला यांच्याकडून आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, हे जाणून घ्या.
मेष : आज तुमचा चांगला दिवस आहे. समाजात चांगले काम केल्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत मिळू शकते.
वृषभ: प्रॉपर्टी डीलरसाठी गुरुवार अधिक फायदेशीर राहील. व्यवसायाच्या सहलीवर जाऊ शकता. कोणताही मोठा निर्णय विचार करूनच घ्या.
मिथुन : काही राजकीय लोकांच्या भेटीमुळे तुमची लोकप्रियता वाढेल. कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. घराच्या नूतनीकरणावर खर्च होऊ शकतो.
कर्क : स्वावलंबनाच्या दिशेने पावले उचलावीत. साहित्याशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. केलेल्या कष्टाचे सार्थक होईल. तसेच तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता.
सिंह: तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. एखादे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. बचत योजनेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
कन्या : तुमचा दिवस आनंदात जाईल. या गुरुवारच्या प्रॉपर्टी डीलमधून तुम्हाला मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे. व्यापार क्षेत्रात लाभापेक्षा मेहनत जास्त राहील.
तूळ : नशिबापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवावा. थोडा वेळ एकांत घालवणे तुमच्यासाठी चांगले राहील. परदेशात मिळत असलेल्या नोकरीच्या संधी युवकांना आकर्षित करू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील.
वृश्चिक : कामाच्या ठिकाणी कोणत्याही कामाचा परिणाम उत्कृष्ट असेल. इतर मार्गाने पैसा मिळेल. कर्जाच्या बाबतीत प्रगती होईल.
धनु : तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. पैसा आणि व्यवसायाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तू खरेदी करू शकता. या राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
मकर : महिलांना गुरुवारी काही विशेष आनंदाची बातमी मिळू शकते. जे आधीच व्यवसायात आहेत काही चांगली माहिती मिळेल. नवीन खरेदीमुळे तुमचा आनंद वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ : गुरुवारी तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील. जर तुम्हाला खरोखरच फायदा मिळवायचा असेल तर इतरांचे मत काळजीपूर्वक ऐका.
मीन: कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईलशी संबंधित लोकांना फायदा होईल. सर्वसाधारणपणे, पैसे मिळू शकतात. गरजूंना मदत करून तुम्हाला समाधान मिळेल.