राशीभविष्य - पाहा, आजचा दिवस कसा जाईल?

  पाहा, तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Updated: Apr 30, 2020, 07:00 AM IST
राशीभविष्य - पाहा, आजचा दिवस कसा जाईल? title=

मेष -   आवडीच्या कामांवर भर द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील. त्यामुळे तुम्ही एकदम आनंदी असाल. तसेच आज चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील.  
 करमणुकीत जास्त वेळ घालवाल.

मिथुन - क्षणिक सुखाने खुश व्हाल. कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

कर्क -  कुटुंबात जास्त प्रेम मिळेल. जोडीदाराचे भरभरुन कौतुक केले तर आनंदात आणखी भर पडेल. मैत्रीचे नाते अधिक घट होईल. घरगुती प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सिंह -  अचानक धनलाभ संभवतो. कामात गतीमानता लाभेल. तसेच आरोग्याच्या किरकोळ गोष्टींचा त्रास होऊ शकतो. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. उगाच काळजी करत बसू नये.

कन्या - कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करावा. मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.  

तूळ -  गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.  इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.

वृश्चिक -  आरोग्याच्या तक्रारी वाढतील. कामाचा ताण कमी करण्यावर भर द्या. पित्त विकार बळावू शकतात.  

धनू - आज गोड बातमी मिळेल. कुटुंबासाठी आपल्याकडे वेळ असेल. एखादी आनंदाची बातमी समजेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल.  

मकर - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामात गतीमानता लाभेल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. कोणतेही काम व्यवस्थित पार पाडा. याचा भविष्यात फायदा आहे.

कुंभ - आज आपल्या कुटुंबीयांना वेळ द्याल. मुलांबरोबर खेळात रमून जाल. घरी एकदम प्रसन्न वाटेल.

मीन - आज आनंदाची बातमी समजेल. कामाचे समाधान लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल.