Horoscope Today 25 May 2022 : आज 'या' तीन राशी होणार मालामाल; पाहा यात तुमचाही सहभाग आहे का

पाहा यात तुमचाही सहभाग आहे का   

Updated: May 25, 2022, 07:43 AM IST
Horoscope Today 25 May 2022 : आज 'या' तीन राशी होणार मालामाल; पाहा यात तुमचाही सहभाग आहे का  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आजचा दिवस कसा असेल, यापेक्षा आजचा आपला दिवस चांगलाच जाणार आहे या निर्धारानं एक नवी सुरुवात करा; पाहा कसा बदल दिसतोय... जाणून घ्या आज तुमची रास तुम्हाला कशी साथ देणारे.... 

मेष- मेष राशीच्या लोकांनी नोकरीच्या ठिकाणी सतर्क रहा. आजचा दिवस प्रसन्नता देणारा असेल. मनावर असणारी धूळ बाजूला करा. 

वृषभ- तुमच्या या राशिमध्ये आज धनलाभाचा योग आहे. नोकरीच्या ठिकाणी एखादं नवं पद तुमची वाट पाहत आहे. नम्रतापूर्ण स्वभावानं तुम्ही इतरांची मनं जिंकाल. प्रवासयोग आहे. 

मिथुन- विवाहयोग आहे. कुटुंबातही एखाद्या जवळच्या व्यक्तीची प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं. 

कर्क- नोकरीच्या ठिकाणी नव्या आणि तितक्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. एखाद्या कलात्मक कामामध्ये तुम्ही रमाल. शरीराच्या बसण्याच्या पद्धतींमध्ये चांगले बदल घडवून आणा लवकरात लवकर परिणाम दिसतील. 

सिंह- आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. इतरांसाठी तुम्ही प्रेरणास्थानी राहणार आहात. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानं पुढे जाण्याचे कैक मार्ग तुम्हासा सापडणार आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील. 

कन्या- मेहनतीच्या बळावर तुम्हाला प्रचंड यश मिळणार आहे. बोलण्यातला गोडवा जपून ठेवा.... हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल. 

तुळ- नोकरीच्या ठिकाणी असणारे नियम पाळा. शारीरिक व्याधी दूर जाणार आहेत. धकाधकीच्या आयुष्यातून स्वत:साठी वेळ काढा. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. दिवस कमाल जाणार आहे. 

वृश्चिक - लहानसहान वादांमध्ये अडकू नका. वेळ सत्कर्मी लावा. स्वत:च्या कामातून स्वत:ला आनंद देण्याचा प्रयत्न करा. गरजूंना मदत करा. 

धनू- सहकाऱ्यांची मदत करा. कोणत्याही अडचणींना वाव देऊ नका, तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर या अडचणी दूर करा. कर्जमुक्त होण्याचा दिवस आहे, मानसिक शांतता लाभेल.

मकर- जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत. जोडीदाराची साथ मिळेल. धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. 

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी आखलेला एखादा जुना बेत यशस्वी होईल. वाहन विक्री यशस्वी ठरेल. लेखनावर भर द्याल. कर्जमुक्त व्हाल, धनलाभही होईल. 

मीन- व्यावसायिकांना लाभ होणार आहे. आखलेले बेत मार्गी लागतील. प्रगतीचा वेग कमी असेल तरीही ती निश्चित आहे. नशिबाची साथ मिळाल्यामुले मालामाल होण्याची संधी आहे. प्रवासयोग आहे.