Horoscope 25 September: शनिवारी 'या' राशीच्या व्यक्तींना राहावं लागणार सतर्क

मेष आणि या राशीच्या व्यक्तींचं उजळेल भाग्य पण या 2 राशीच्या लोकांना बाळगावी लागणार सावधगिरी वाचा 25 सप्टेंबरचं राशीभविष्य

Updated: Sep 24, 2021, 11:13 PM IST
Horoscope 25 September: शनिवारी 'या' राशीच्या व्यक्तींना राहावं लागणार सतर्क
मुंबई: प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी संकट. संकटांची चाहून जर आधीच लागली तर त्यावर तोडगा काढणं सोपं असतं. शनिवारी काही राशींसाठी आर्थिक फायदा तर काही राशींसाठी चांगला योग घेऊन येणारा ठरणार आहे. तर काही राशींच्या लोकांना शनिवारी सावध रहावं लागणार आहे. शनिवारी 25 सप्टेंबरचं कसं असेल राशीभविष्य जाणून घेऊया.
 
मेष: या राशीच्या व्यक्तींच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. 
 
वृषभ: ऊर्जेनं भरलेला दिवस असणार आहे. कामाच्या ठिकाणी मेहनतीचं फळ मिळेल. मन प्रसन्न राहणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीगाठीचा योग आहे. 
 
मिथुन: कामात योग्य ते प्रयत्न यशस्वी होतील. भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित होतील. कामाच्या ठिकाणी चांगलं फळ मिळणार आहे.
 
कर्क: मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल. हाती घेतलेलं काम मार्गी लागेल. 
 
सिंह: आयुष्यात चढ-उतार पाहावे लागणार आहेत. मेहनत फळाला येईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. मित्रांसोबत भेटीगाठी होतील. 
 
कन्या:  शनिवारचा दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे. भाग्य साथ देईल. कामाचा उत्साह असेल. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील. 
 
तुळ: ऊर्जेनं भरलेला दिवस असणार आहे. व्यवसायात मोठा फायदा होईल. शत्रूंना तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका. भाग्य साथ देईल मात्र सावध राहा. 
 
वृश्चिक: भाग्य साथ देणार आहे. शुभकार्यात आपला सहभाग असणार आहे. मधुर वाणीनं लोकांची मनं जिंकाल.चतुराईचं कौतुक होईल. 
 
धनु: कामाच्या ठिकाणी समस्या सुटतील. कामाचे चांगले रिटर्न्स मिळतील. आरोग्य चांगलं राहील. तुम्ही दिलेला सल्ला इतरांच्या कामी येईल.
 
मकर: दिवस खूप चांगला जाणार आहे. संघर्षाचा समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कुटुंबाची साथ मिळेल. हिम्मत सोडू नका. 
 
कुंभ: भाग्य साथ देईल. कामाच्या ठिकाणी आपलं कौतुक होईल. शनिवारी मूड खूप चांगला असणार आहे. 
 
मीन: शनिवारचा दिवस तुम्ही विसरू शकणार नाही. चतुराईनं यशापर्यंत पोहोचावं लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.