खरं प्रेम ओळखायचयं? या 7 गोष्टींमुळे कळतील तुमच्या पार्टनरच्या Feelings

खरं प्रेम कसं ओळखाल? या 7 गोष्टींमुळे कळेल पार्टनरचा तुमच्यावर किती जीव आहे?  

Updated: Apr 16, 2022, 03:16 PM IST
खरं प्रेम ओळखायचयं? या 7 गोष्टींमुळे कळतील तुमच्या पार्टनरच्या Feelings  title=

मुंबई : जीवनात आपल्यावर प्रेम करणारा व्यक्ती आपल्या जवळ असावा असं प्रत्येकाला वाटतं... आपण त्या व्यक्तीवर पूर्ण मनाने प्रेम करतो... त्याला वेळ देतो... त्याच्या आवडी-निवडी लक्षात घेतो... पण आपल्या समोरचा व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही... हे कित्येकदा आपल्याला कळत नाही... त्यामुळे या 7 गोष्टी नक्की वाचा... ज्यामुळे तुम्हाला कळेल तुमचा पार्टनर तुमच्यावर खरंच प्रेम करतो की नाही?

रिअल पर्सनालिटी
जेव्हा कधी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत असाल तेव्हा त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्यावर कोणताही मुखवटा नसेल. तो/ती जसे आहेत तसे तुमच्यासमोर वावरतील. तुमच्या नात्याला कितीही वर्ष होऊद्या पण ती व्यक्ती तुमच्याशी पूर्वीप्रमाणेच वागत असेल तर खऱ्या प्रेमाची ही एक पावती आहे.

कुटुंबाबद्दल प्रेम
जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुमच्या कुटुंबासह तुम्हाला स्वीकारते. अशी व्यक्ती तुमच्या कुटुंबाला आणि जवळच्या मित्रपरिवारालाही जितके तुम्ही प्रेम आणि सन्मान देता तितकाच देण्याचा प्रयत्न करेल. 

सिनेमांचा प्रभाव नाही
सिनेमा पाहणे कितीही आवडीचे असले तरी त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर कितपत असावा, याला काही मर्यादा असतात. रोमॉन्टीक सिनेमे बघून त्याप्रमाणे खऱ्या आयुष्यातही अपेक्षा करणे चुकीचे आहे.

तुमचा अभिमान
तुमच्या कामाचा, चांगल्या वागण्याचा, गुणांचा अभिमान तुमच्या पार्टनरला असायला हवा.

सरप्राईज
सरप्राई्जेस कोणाला नाही आवडत. पण नेहमीच त्याची अपेक्षा आपल्या पार्टनरकडून न ठेवता तुम्ही कधीतरी त्याला/तिला एखादे सुखद सरप्राईज द्या.

सतत कामात नाक खुपसणे
सतत पार्टनरच्या कामात नाक खुपसणे, सतत सूचना देणे कदाचित त्याच्या/तिच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. पार्टनरलाही त्याची स्पेस द्या आणि त्याच्या पद्धतीने जगू द्या. 

सतत तुमच्याबद्दल बोलणे
जेव्हा तुम्ही सोबत नसता किंवा तुमच्या अनुपस्थितीत तो/ती नेहमी तुमच्याबद्दल बोलत असतात. मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना नेहमी तुमच्याबद्दल सांगत असतात, हे देखील खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे.