कृष्णजन्मापूर्वी 'सूर्य' बदलणार रास; 'या' चार राशींना मिळणार गडगंज पैसा, नोकरीत बढती आणि बरंच काही

पाहा तुमचीही रास यात आहे का...   

Updated: Aug 12, 2022, 10:02 AM IST
कृष्णजन्मापूर्वी 'सूर्य' बदलणार रास; 'या' चार राशींना मिळणार गडगंज पैसा, नोकरीत बढती आणि बरंच काही  title=
Janmashtami and Sun Transit 2022 money promotion

Sun Transit in Leo on 17 august 2022: ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध 4 राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच भरभराटीचा असणआर आहे. या राशींवर श्रीकृष्ण आणि सूर्यदेवाची कृपा असणार आहे. 18 ऑगस्टला असणाऱ्या अष्टमीच्या दिवशीश्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा करण्यात येणार आहे. याआधी एक दिवस म्हणजेच 17 ऑगस्टला सूर्य रास बदलून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

सध्याच्या घडीला सूर्य कर्क राशीत आहे. चला पाहुया सूर्य गोचरामुळं लाभ होणाऱ्या राशी नेमक्या कोणत्या आहेत... (Janmashtami and Sun Transit 2022 )

मेष- श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या एक दिवस आधी सूर्याचं गोचर मेष राशीसाठी चांगला काळ घेऊन येणार आहे. त्यांना नशीबाची साथ मिळणार आहे. त्यांची अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. प्रेमसंबंध, वैवाहिक नाती सर्वकाही सुरळीत असेल. 

कर्क- सूर्य कर्क राशीतून बाहेर पडत असल्यामुळे राशीच्या जातकांना याचा फायदा मिळणार आहे. करिअरमध्ये त्यांना मोठी संधी मिळेल. बदली, नोकरीत बढती, नवी नोकरी अशा संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत. हे सर्व बदल भविष्यासाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहेत. 

सिंह - सूर्याचं सिंह राशीत प्रवेश करणं या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींना समाजात आदराचं स्थान मिळणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणं निकाली निघतील. एखादी शुभवार्ता कळेल. 

तुळ - या राशीच्या व्यक्तींची भरभराट होणार आहे. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळणार आहे. आरोग्याच्या सर्व तक्रारी दूर होणार आहेत. एखादी नवी संधी तुमच्या प्रतिक्षेत आहे. 

(वरील माहिती सामान्य समजुतींवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)