Jaya Ekadashi 2024 Date and Time :
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी अतिशय महत्त्वाची आणि विशेष मानली जाते. एकादशी तिथी ही भगवान विष्णुला समर्पित आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला तिथीला जया एकादशी म्हटलं जातं. जया एकादशीला यंदा अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आला आहे. जया एकादशी ही 20 फेब्रुवारी 2024 साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी सुख आणि सौभाग्य वाढ होण्यासाठी भगवान विष्णूची पूजा करण्यात येते. त्याशिवाय पंचांगानुसार यादिवशी प्रीति योग, आद्रा नक्षत्र, आयुष्मान योग यांसह अनेक शुभ संयोग जुळून येणार आहे. तसंच या दिवशी 20 फेब्रुवारी 2024 ला ग्रहांचा राजकुमार बुध मकर राशीतून बाहेर पडून शनिच्या कुंभ राशीत गोचर करणार आहे. याचा फायदा काही राशींना होणार आहे. (Jaya Ekadashi 2024 Date shubh sanyog and budh gochar on 20 february 2024 Increase in happiness and immense wealth for people of this zodiac sign)
मानसिक तणावातून तुम्हाला आराम मिळणार आहे. नोकरीत बढतीची संधी मिळणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद असणार आहे. तुमच्या तब्येत सुधारणार होणार आहे. तर प्रेमसंबंधांमध्ये मधुरता वाढणार आहे.
करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होणार आहे. पैशाची आवक वाढण्यासाठी नवीन मार्ग मोकळे होणार आहे. भौतिक सुखसोयी वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नोकरीत बढती मिळणार आहे. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होणार आहे.
मित्रांच्या मदतीने कामातील अडथळे दूर होणार आहे. व्यवसायात प्रगतीची संधी मिळणार आहे. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असणार आहे.
कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देणार आहात. अध्यात्मिक कार्यात रुची वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती असणार आहे. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होणार आहे.
नोकरदार लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला मागील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळणार आहे. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. व्यवसायात प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)