Gajkesari Rajyog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शास्त्रात राहूला मायावी ग्रह मानलं आहे. सध्या राहू मेष राशीत असून 30 ऑक्टोबरपर्यंत मेष राशीत बसणार आहे. या दिवशी राहू आपली रास बदलून मीन राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान राहूच्या या राशीबदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी राहू राशी बदल करून मीन राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान त्याच वेळी चंद्र देखील मेष राशीमध्ये स्थित होणार आहे. त्यामुळे या काळात गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. यावेळी काही राशींच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया गजकेसरी योगामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे.
सध्या गुरू आणि राहू दोन्ही मेष राशीत असणार आहेत. राहूच्या राशी बदलामुळे मेष राशीचे लोक गुरु चांडाळ दोषापासून मुक्त होणार आहेत. त्याच वेळी चंद्राच्या भ्रमणामुळे राजयोग तयार होईल. यामुळे मेष राशीच्या लोकांचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढणार आहे.
सध्या देवगुरु बृहस्पति कर्क राशीच्या करिअर घरामध्ये आहे. यासाठी कर्क राशीच्या व्यक्तीला त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या इच्छेनुसार यश मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील.
सध्या सिंह राशीच्या भाग्यस्थानात गुरु उपस्थित आहे. त्यामुळे राहूच्या बदलामुळे मीन राशीच्या लोकांचे भाग्य वाढणार आहे. या राशीच्या लोकांना परदेशातही नोकरीच्या संधी मिळू शकतात.
सध्या केतू तूळ राशीत आहे. त्याच वेळी, 30 ऑक्टोबर रोजी केतू तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या काळात तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. या शुभ संयोगाने तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत.
गजकेसरी योगामुळे मीन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. त्याचसोबत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात साकारात्मक परिणाम होणार आहे. तुमची आर्थिक बाजू भक्कम असणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )