Kamada Ekadashi 2024 : चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना असून या महिन्यातील पहिली एकादशी कधी आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. एक शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असं म्हणतात. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णुला समर्पित असून यादिवशी ज्योतिषचार्यानुसार काही उपाय केल्यास तुम्हाला अनेक लाभ मिळतात. (kamada ekadashi 19 april 2024 muhurat vrat parana financial constraints remedies in marathi )
पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 18 एप्रिल 2024 ला संध्याकाळी 05:31 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 19 एप्रिल 2024 ला रात्री 08:04 वाजेपर्यंत असणार आहे.
पूजा वेळ - सकाळी 05.51 ते सकाळी 10.43 वाजेपर्यंत
कामदा एकादशीचे व्रत 20 एप्रिल 2024 ला सकाळी 05.50 ते 08.26 या वेळात व्रत सोडता येईल.
कामदा एकादशीचे व्रत केल्यास भक्ताला 100 यज्ञांचे फळ प्राप्त होते अशी धार्मशास्त्रात मान्यता आहे. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होता. म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं. कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे हजारो वर्षांच्या तपश्चर्येने जे पुण्य आणि तसंच कन्यादान इत्यादींचे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं, असे वेद आणि पुराणात सांगण्यात आलंय. कामदा एकादशीला फलदा एकादशी म्हटलं जातं.
1. सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.
2. पूजास्थान स्वच्छ करा आणि दिवे लावा.
3. भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.
4. भगवान विष्णूंना फळं, फुलं, नैवेद्य आणि उदबत्तीन अर्पण करा.
5. विष्णु सहस्रनाम किंवा गंगा स्तोत्रचं पठण करा.
6. दिवसभर उपवास ठेवा आणि फक्त सात्विक अन्न ग्रहण करा.
7. रात्री कीर्तन करा आणि भगवान विष्णूची आरती नक्की करा.
आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान विष्णूच्या बीज मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 5 वेळा जप करा, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. त्याशिवाय एकादशीला गरजूंना अन्न, कपडे, पैसे किंवा इतर आवश्यक वस्तूचं दान तुम्ही करु शकता.
या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा आणि उपाय केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. एकादशीला दोन हळदीचे तुकडे भगवान विष्णूला अर्पण करा. त्याशिवाय ओम केशवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा.
पिवळा रंग भगवान विष्णूला प्रिय असून तो समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे एकादशी व्रताच्या दुसऱ्या दिवशी ही विष्णुंना अर्पण केलेली पिवळं फुलं आदराने पाण्यात सोडा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. या उपामुळे कामाच्या ठिकाणीच्या सर्व अडथळे दूर होतात, असं म्हणतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)