Ketu Gochar : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी केतू आणि राहू हे उपग्रह मानले जातात. लवकरच राहू आणि केतू त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. 30 ऑक्टोबरला मीन राशीत प्रवेश करतील. ज्याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहे. दरम्यान राहू आणि केतूचं गोचर कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ ठरणार आहे हे पाहूयात.
मेष राशीच्या लोकांना केतूच्या पाचव्या घरात प्रवेशामुळे आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात कुटुंबातील मुलांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. जमिनीचा वाद होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. मित्रांसोबत वाद होऊ शकतात. तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये काही वाद होऊ शकतात. तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
वृषभ राशीसाठी केतूचा राशी बदल खूप अशुभ परिणाम देणार आहे. वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. घरात कलहाची परिस्थिती निर्माण होईल. या काळात तुम्हाला आर्थिक काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
कन्या राशीतील केतूच्या गोचरमुळे तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकते. नोकरी-व्यवसायात सावध राहावं लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय संवेदनशील आहे. जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला काळजीपूर्वक अभ्यास करणं आवश्यक आहे. तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
केतूच्या संक्रमणादरम्यान, मीन राशीच्या लोकांना त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असू शकते. नवीन जमीन किंवा व्यवसायाबाबतही शहाणपणाने निर्णय घ्यावं. हा काळ तुमच्यासाठी अशुभ मानला जातो. यावेळी मुलांकडून वाईट बातमी मिळू शकते. जोडीदाराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. घरात अचानक कोणत्याही कारणावरून वाद होऊ शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )