आजचे राशीभविष्य | मंगळवार | ५ नोव्हेंबर २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Bollywood Life | Updated: Nov 5, 2019, 08:43 AM IST
आजचे राशीभविष्य | मंगळवार | ५ नोव्हेंबर २०१९  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- कामाच्या ठिकाणी अपेक्षित गोष्टींमध्ये सहमती मिळेल. पदोन्नतीच्या निमित्ताने हा काळ तुमच्यासाठी फलदायी आहे. 

वृषभ- कामाच्या ठिकाणी आज सांभाळून राहा. आज एखादी मोठी जूबाबदारी तुम्हाला मिळू शकते. नेतृत्वकौशल्यावर तुम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पा़डा. 

मिथुन- बारा वर्षांनंतर धनू तुमच्या राशीत आला आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी आहे. इतर व्यक्ती तुमच्याकडून बरंच काही शिकण्याची इच्छा व्यक्त करतील. 

कर्क- आज मोठ्या धीराने काम कराल. तुमचं काम अगदी सोपेपणाने आणि शांततेने पूर्ण होईल. कामं वेळेत पूर्ण करा, फायद्याचं ठरेल. 

सिंह- कामाच्या ठिकाणी एखादी अडचण जाणवेल. विचार नीट ठेवा. कामाच्या ठिकाणी सांगोपांग विचार करुन पुढचे निर्णय घ्या. कोणतीही संधी दवडू नका. 

कन्या- कोणालाही सल्ला देऊ नका. सल्ला चांगल्या उद्देशाने दिलात तरीही त्यावर टीका होण्याची शक्यता आहे. कोणी मदत मागितली तर अवश्य करा. अन्यथा स्वत:च्या कामावर लक्ष द्या. 

तुळ- कामाच्या ठिकाणी मनस्थिती मजबूत ठेवा. मिळालेल्या संधीचं सोनं करा. अनेक गोष्टी तुमच्या वाटेत अडथळा निर्माण करु शकतात. 

वृश्चिक- इतरांचं मन जिंकाल. कामाच्या ठिकाणी स्वत:ची काळजी घ्या. चांगला व्यवहार आणि वागणूक तुम्हाला फायद्याची ठरेल. 

धनू- थकवा दूर करण्यासाठी एखादा मार्ग शोधा. पुढे जाण्यासाठीच्या संधी तुमच्या प्रतिक्षेत आहे. 

मकर- आज बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडतील. जास्त चिंता करु नका. ज्या प्रशंसेच्या प्रतिक्षेत आहात ती तुमच्या वाचट्याला येईल. जी पुढे अगदी शेवटच्या स्थानापर्यंत तुमची साथ देईल. 

कुंभ- कोणतीच गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही. अधिक दृढतेने पुढे जाल. जे हवं आहे ते अगदी सोपेपणाने आणि सहजतेने मिळेल. जे निर्णय घ्याल ते फलदायी ठरतील. 

मीन- अनेक संधी तुमच्या प्रतिक्षेत आहेत. फक्त त्या संधीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. गोष्टींचा प्राधान्यक्रम निश्चित करा.