close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शुक्रवार | १८ ऑक्टोबर २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Oct 18, 2019, 08:03 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | १८ ऑक्टोबर २०१९

मेष- अधिकाधिक अडचणींवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. मोठ्या गुंतवणूकीचा तुम्हाला फायदा होईल. कोणतीच संधी गमावू नका. दिवस अगदी वेगात व्यतीत होईल. नोकरी किंवा व्यवसायात काही महत्त्वाचे बदल करण्याचे निर्णय घ्याल. 

वृषभ- स्वत:वर विश्वास ठेवा. मेहनत करा. माहिती मिळवा. इतरांची भेट घ्या, गरज वाटल्यास प्रवासही करा. आज तुमच्या आयुष्यातील अनेक पैलू बदलतील. काही नवे अनुभव मिळतील. जुनं सारंकाही विसरण्याचा प्रयत्न करा. आज मोकळेपणाने आणि पूर्ण उत्साहात इतरांचं म्हणणं ऐकून काही कामं कराल. राहणीमानातही काही महत्त्वाचे बदल होतील. 

मिथुन- आज काही नवे प्रयोग कराल. आत्मविश्वास वाढलेला असेल. मनाचा आवाज ऐका. प्रत्येक नात्यामध्ये सहजता असेल. कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत फिरायला जाण्याचे बेत आखाल. 

कर्क- प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. आज कोणा एका व्यक्तीला तुमच्या मनीची गोष्ट पटवून सांगण्यात यशस्वी ठराल. एकांतात काही वेळ व्यतीत करा, फायद्याचं ठरेल. कामाच्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. पण, येत्या काळात तीसुद्धा फायद्याची ठरेल. 

सिंह- चांगल्या संधीच्या शोधात असाल तर ती संधी मिळेल. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी नव्या संधी तुमच्या प्रतिक्षेत आहेत. अडचणी दूर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासयोग आहेत. इतरांचं म्हणणं ऐका. तुमच्या कामाने इतरांची मनं जिंका. 

कन्या- कामाच्या ठिकाणी आज बऱ्याच अंशी यशस्वी राहाल. करिअरच्या दृष्टीनेही बऱ्याच बाबतीत यशस्वी ठराल. तणाव घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. बढती मिळण्याची शक्यता आहे. नव्या मित्रमंडळींशी भेटीगाठी घडतील. 

तुळ- चांगले बेत आखलात आणि चांगल्या विचारांची तुम्हाला साथ असेल तर, मोठ्या फायद्याची शक्यता आहे. विचाराधीन असणारी कामं पूर्णत्वास जाण्याचे पूर्ण योग आहेत. नोकरी किंवा दिनचर्येत बदल करण्याविषयी थोडा विचार करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक- कामाच्या ठिकाणी वाढीव जबाबदारी मिळू शकते. नवी कामं सुरु करण्याचा विचार कराल. इतरांच्या म्हणण्यावर लक्ष द्या. काम जास्त नसतानाही दिवस घाईचा असेल. नोकरीच्या ठिकाणी असणारी एखादी अडचण दूर होईल. आर्थिक व्यवहार संपवा. 

धनू- पैशांच्या बाबतीन विचारपूर्वक निर्णय घ्या. साथीदाराचा सल्ला फायद्याचा ठरु शकतो. अर्थार्जनाचे नवे बेत आखू शकता. नोकरीत एखादी चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सल्ल्यांचा इतरांना फायदा होऊ शकतो. 

मकर- धीर आणि सातत्य ठेवा, मेहनत करा. त्याचे परिणाम तुमच्याच पक्षात असतील. जुन्या मित्रांशी चर्चा किंवा त्यांना भेटण्याचा योग आहे. जबाबदाऱ्या पूर्ण होतील. विचाराधीन कामंही पूर्ण होतील. सोबतच्या व्यक्तींची काळजी घ्या. 

कुंभ- काही महत्त्वाचे बदल घडण्यास आजपासून सुरुवात होईल. गुढ घटनांकडे तुमचा कल जास्त असेल. चांगली वर्तणूक फक्त तुम्हाला यशस्वीच करणार नाही, तर तुम्हाला भेटणाऱ्या इतरांनाही यातून आनंद मिळेल. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहेत. दृष्टीकोन कायम सकारात्मक ठेवा. 

मीन- आज कामं पूर्ण करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करा. व्यग्र असूनही आजचा दिवस चांगला आहे. आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. कुटुंबात लहानांची मदत होईल. कामाच्या ठिकाणी धनलाभाची शक्यता आहे.