मेष - नवीन अनुभव येऊ शकतात. अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचं मत स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याचं म्हणणं पूर्णपणे ऐका. प्रत्येक कामातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण चांगल राहील.
वृषभ - वेळ चांगली आहे. पैशांच्या बाबतीत लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या आव्हानांसाठी तयार राहा. इतरांसाठी तुमचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरु शकतो. फ्री होऊन काम करा. मित्र, भावंडांची मदत मिळू शकते.
मिथुन - स्वत:च्या योजनांवर विश्वास ठेवा. पैशांच्या बाबतीत चांगल्या संधी मिळू शकतात. त्यावर गंभीरतेने विचार करा. करियर, कॉन्टॅक्ट्ससाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. महिलांसाठी दिवस शुभ आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क - लोकांशी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दिवस चांगला आहे. कामासंबंधी एखादी गुप्त माहिती मिळू शकते. जबाबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जवळच्या लोकांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील वातावरण चांगलं राहील.
सिंह - व्यस्त राहाल. मात्र घर-कुटुंबियांशी संपर्कात राहा. महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमवण्याच्या इतर संधी उपलब्ध होऊ शकतात.
कन्या - दिवस चांगला आहे. पैशांसंबंधी समस्या कमी होतील. खास व्यक्तीचा सल्ला, मदत मिळू शकते. विश्वासू व्यक्तीशी तुमच्या मनातील गोष्टी शेअर करु शकता. कामं वेळेत पूर्ण होतील.
तुळ - एखाद्या गोष्टीसाठी अधिक उत्साही असाल. नवीन अनुभव येतील. काही व्यक्तींची भेट भविष्यात फायदेशीर ठरु शकते. व्यवसायात नवीन कामाची सुरुवात करु शकता. करियरमध्ये पुढे जाण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. धार्मिक कामांत मन रमेल. अनेक दिवसांपासून विचार करत असलेलं काम करु शकता.
वृश्चिक - अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. नवीन माहिती मिळेल. तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. आलेली संधी ओळखून त्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करा.
धनु - आत्मविश्वास राहिल. नवीन संधी मिळू शकतात. वादात अडकू नका. तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी इतरांची मदत मिळू शकते.
मकर - वेळ मिळाल्यास आराम करा. कोणत्याही योजनेवर काम करताना विचार करुनच पुढे जा. जोडीदारासोबत वेळ जाईल. खासगी समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. इतर समस्या असल्यास इतरांशी बोलूनच त्या सोडवल्या जाऊ शकतात.
कुंभ - कायदेशीर बाबींमध्ये चांगली बातमी मिळू शकते. मित्रांसोबत योजना आखू शकता. लोकांसोबत तालमेळ राहील. प्रवासाचा योग आहे. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होऊ शकतो.
मीन - तुमचे विचार स्पष्टपणे मांडा. लोक तुमच्या विचारांशी सहमत होऊ शकतात. महत्त्वाचं काम करताना विश्वासू व्यक्तीची मदत घ्या. आत्मविश्वास वाढेल.