अतिशय प्रभावशाली आहे पत्रिकेतील हा योग, गरीब व्यक्तीलाही मिळेल अमाप पैसा

पत्रिकेतील हा योग तुम्हाला मालामाल करेल  

Updated: Jan 18, 2022, 05:17 PM IST
अतिशय प्रभावशाली आहे पत्रिकेतील हा योग, गरीब व्यक्तीलाही मिळेल अमाप पैसा  title=

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील शुभ योग, दोष आणि घर यांचे विशेष महत्त्व आहे. कुंडलीतील कोणताही योग ग्रह आणि घरांच्या मिलनाने तयार होतो. कुंडलीतील घरातील ग्रहांची स्थिती शुभ योग तयार करते, तर कुंडलीत अशुभ ग्रहांमुळे अशुभ योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात अनेक योग सांगितले गेले असले तरी त्यातील काही फार शुभ मानले जातात. त्यातील एक म्हणजे अखंड साम्राज्य योग. अखंड साम्राज्य योगाबद्दल जाणून घ्या.

काय असतं अखंड साम्राज्य योग? 

अखंड साम्राज्य योग अत्यंत शुभ आहे. या योगामुळे व्यक्तीला धन आणि सुख प्राप्त होते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग असतो त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळते. गरीब कुटुंबात जन्म घेऊनही अशा लोकांची माता लक्ष्मीच्या कृपेने दिवसरात्र प्रगती होते. याशिवाय असे लोक जीवनातील प्रत्येक सुखाचा आनंद घेतात. एवढेच नाही तर अखंड साम्राज्य योग असलेले लोक यशस्वी राजकारणी देखील बनतात. या योगाचा प्रभाव वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंत राहतो.

कसं बनतं अखंड साम्राज्य योग?

ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या कुंडलीत अखंड साम्राज्य योग तयार होतो. जेव्हा कुंडलीत दुसऱ्या, पाचव्या किंवा अकराव्या घराचा स्वामी गुरु असतो तेव्हा हा योग तयार होतो. याशिवाय कुंडलीच्या दुसऱ्या, 9व्या आणि 11व्या घरात गुरूसोबत चंद्र मजबूत स्थितीत असेल तर अखंड साम्राज्य योग तयार होतो. त्याचबरोबर कुंडलीच्या दुसऱ्या, 10व्या आणि 11व्या घरातील स्वामी ग्रह केंद्रस्थानी एकत्र आल्यावरच हा दुर्मिळ योग तयार होतो.

अखंड साम्राज योगाचं महत्व

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत अखंड साम्राज्य योग तयार होतो, त्याला आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही. अशा लोकांना वडिलांच्या संपत्तीवरही पूर्ण अधिकार असतो. याशिवाय या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला करिअर आणि बिझनेसमध्ये प्रचंड यश मिळते. इतकेच नाही तर या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळतात.