'या' 4 राशींवर असते मारूती रायाची कृपा, कोणत्या राशी आहेत जाणून घ्या...

चला जाणून घेऊया... कोणत्या राशींच्या लोकांवर असते मारूती रायांची कृपा....

Updated: Jan 18, 2023, 07:06 PM IST
'या' 4 राशींवर असते मारूती रायाची कृपा, कोणत्या राशी आहेत जाणून घ्या... title=

Astro News : बजरंगबली म्हणजेच हनुमानजींची कृपा आपल्यावर सदैव राहावी, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. आयुष्यात कोणतीही संकटे आली तरी हनुमानजी त्यांचा भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांचा पाठीशी नेहमीच उभे असतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हनुमानजी सर्वांचेच रक्षण करण्यासाठी धावून येत नाहीत. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. परंतु यापैकी केवळ 4 राशी अशा आहेत, ज्यांच्या पाठीशी हनुमानजी नेहमीच रक्षण करण्यासाठी उभे राहतात.  त्यांना न मागता हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो.

मेष (Arise) 
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांवर हनुमानजींची कृपा कायम राहते. त्यासाठी या राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमानजीची पूजा करावी. असे केल्याने त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख व संकटे दूर होतात. या राशीच्या लोकांना आर्थिक तंगीचा त्रास होत नाही. त्याचबरोबर हनुमान जी त्यांचा आयुष्यात येणाऱ्या संकटापासून त्यांचे नेहमी रक्षण करतात.

सिंह (Leo)
सिंह राशीचा देखील हनुमानजींच्या आवडत्या राशींमध्ये समावेश आहे. या राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते. या लोकांनी मंगळवारी पूजा केली तर त्यांची आर्थिक अडचण दूर होते.

हेही वाचा : Remo D'Souza ही झाला हास्यजत्रेचा फॅन! 'अवली लवली कोहली' गाण्यावर थिरकत व्हिडीओ केला शेअर

कुंभ (Aquarius) 
हनुमानजीची कुंभ राशीच्या लोकांवर विशेष कृपा असते. हनुमानजींच्या कृपेनं कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळते. त्याचबरोबर आर्थिक संकटातून त्यांची सुटका होते. या राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमानजींची पूजा केली तर त्यांना कोणत्याही कामात अडथळा येत नाही. या राशीच्या लोकांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरलेले असते.

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा राहते असे म्हटले जाते. या राशीच्या लोकांनी मंगळवारी पूजा केली तर त्यांच्या सर्व कामांमध्ये यश मिळते. त्याचबरोबर त्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)