मुंबई : लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल पाहायला मिळतात. मग ती मुलं असोत की मुली. आज आपण अशा राशीच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या लग्नानंतर सासरच्या घरात राणी बनून राहतात. इतकंच नाही तर सासरच्या घरात ते स्वतःच्या इच्छेनुसार राहतात. लग्नानंतर देखील या राशींच्या मुली स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनान जगतात.
कन्या राशी
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या मुली खूप मोकळ्या मनाच्या असतात. कन्या राशीच्या मुली प्रत्येक काम स्वतःच्या इच्छेनुसार करतात. या राशीच्या मुलींचं लग्न ज्या घरात होतं, त्या ठिकाणी त्या राणीसारखं राज्य करतात. त्यांना पतीची पूर्ण साथ मिळते. सासरच्या घरी ते खूप काही करतात. इतकंच नाही तर लग्नानंतरही त्या मोकळेपणानं आपलं मत मांडतात.
वृश्चिक राशी
या राशीच्या मुली खूप हुशार असतात. आपल मत इतरांना पटवून देण्यास या राशीच्या मुली चपळ असतात. काही करण्याचं ठरवल्यानंतर वृश्चिक राशीच्या मुली मागे वळून पाहत नाहीत. लग्नानंतर सासरी देखील मुली स्वतःच्या इच्छेने जगतात. लग्नानंतर या राशीच्यामुली सासरी स्वतः आणि इतरांना देखील आनंदी ठेवतात.
धनु राशी
या राशीच्या मुलींचा स्वभाव इतर मुलींपेक्षा खूप वेगळा असतो. आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने सर्वांची मने जिंकतात. या राशीच्या मुलींना कोणत्याही कामात निष्काळजीपणा अजिबात आवडत नाही. त्यांना प्रत्येक क्षेत्राबाबत माहिती असते. कुठेही गेली तरी सर्वांना एकत्र ठेवण्यावर या राशींच्या मुलींचा प्रयत्न असतो. त्यामुळेच मुलींना सासरच्या घरात मान मिळतो.
(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)