Mahashivratri 2024 : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या ज्योतिर्लिंगा पूजा करावी? 12 राशींसोबत 12 ज्योतिर्लिंगांचा शुभ संबंध!

Mahashivratri 2024 : शिवमहापुराणानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाला माता पार्वतीसोबत महादेवानी विवाह केला होता. या दिवशी महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो. भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, अशात महादेवाचा आशीर्वाद आणि तुमच्या पूजेचे पूर्ण फळं मिळावं यासाठी राशीनुसार ज्योतिर्लिंगाची पूजा करा. 

नेहा चौधरी | Updated: Mar 6, 2024, 02:25 PM IST
Mahashivratri 2024 : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या ज्योतिर्लिंगा पूजा करावी? 12 राशींसोबत 12 ज्योतिर्लिंगांचा शुभ संबंध! title=
Mahashivratri 2024 Which Jyotirlinga should be worshiped by which zodiac sign Auspicious association of 12 Jyotirlingas with 12 zodiac signs in marathi

Auspicious association of 12 Jyotirlingas with 12 zodiac signs in marathi : शिव महापुराणानुसार, महादेव हे सनातन काळापासून विश्वाचा निर्माता, संचालक आणि संहारक आहे. जेव्हा ग्रह देखील नव्हते तेव्हा महादेव स्वयंभू प्रकट झाले. विश्वाच्या प्रत्येक भागामध्ये लिंगाच्या रूपात आणि 'ओंकार' च्या नादात विश्वाचा दाता महादेव आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार एकूण 64 ज्योतिर्लिंगे असून त्यापैकी 12 ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे. या 12 ज्योतिर्लिंगाला 'द्वादशा ज्योतिर्लिंग' असंही म्हणतात. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रत्येक ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे वेगळे रूप आहेत. मग महादेवाच्या कुठल्या रुपाची आराध्यना केल्यास पूजेचे पूर्ण फळं मिळले याबद्दल जाणून घेऊयात. 12 राशींसोबत 12 ज्योतिर्लिंगांचा शुभ संबंध आहे. त्यानुसार तुमच्या राशीनुसार कुठल्या ज्योतिर्लिंगाची पूजा करायची पाहूयात. (Mahashivratri 2024 Which Jyotirlinga should be worshiped by which zodiac sign Auspicious association of 12 Jyotirlingas with 12 zodiac signs in marathi)

द्वादश ज्योतिर्लिंगाचा 12 राशींशी संबंध

मेष रास - रामेश्वरम ज्योतिर्लिंग

या ज्योतिर्लिंगाची स्थापना श्री राम वनवासात असताना केली होती. श्री राम हे सूर्यवंशी असून ते सूर्याचे प्रतिनिधित्व करतात. सूर्य हा मेष राशीत उच्च असून तो रामेश्वरम ज्योतिर्लिंगाशी संबंध आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी. असं म्हणतात की, जोडप्यामधील वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढावा म्हणून त्यांनी तामिळनाडूतील या मंदिराच दर्शन घ्यावं. 

वृषभ रास - सोमनाथ ज्योतिर्लिंग

वृषभ राशीचा संबंध सोमनाथ ज्योतिर्लिंगाशी असून हे ज्योतिर्लिंग गुजरातच्या सौराष्ट्र भागात असलेल्या सोमनाथ जिल्ह्यात आहे. त्याशिवाय हे पृथ्वीचे पहिले ज्योतिर्लिंग मानले गेले आहे. शास्त्रांनुसार देवता चंद्राने या ज्योतिर्लिंगाची स्थापना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी केली, अशी आख्यायिका आहे. वृषभ राशीच्या लोकांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करून या मंदिराला भेट दिल्यास त्यांची सर्व इच्छा पूर्ण होते. 

मिथुन रास - नागेश्वर ज्योतिर्लिंग

राहु नागाचे प्रतिनिधित्व करत असून ज्याचा अर्थ नाग मानला जातो. राहु मिथुन राशीमध्ये उच्च स्थान मानला जातो. म्हणून मिथुन राशीचे प्रतिनिधित्व नागेश्वर ज्योतिर्लिंगा करतो. मिथुन राशीच्या लोकांनी नागेश्वर ज्योतिर्लिंगावर किंवा इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगावर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करून गेंडा फूल, शमी पत्र आणि बिल्वपत्र अर्पण केल्यास फायदा मिळतो. 

कर्क रास - ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग

बृहस्पति ग्रह कर्क राशीमध्ये उच्च स्थानी आहेत. ओकारेश्वर ज्योतिर्लिंग हे दैवी अक्षर "ओम" किंवा 'ओंकार' चे प्रतिनिधित्व करतो. हे दक्षिणमुर्खी ज्योतिर्लिंग असून ते मध्य प्रदेशातील मांधाता नावाच्या सुंदर बेटावर आहे. या मंदिरात कर्क राशीच्या लोकांनी पूजा केल्यास त्यांना द्विगुणीत फळ मिळतं. 

सिंह रास - वैद्यनाथ ज्योतिर्लिंग

सिंह राशी सूर्याच्या मूल त्रिकोण चिन्हाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून ते झारखंडच्या देवघर जिल्ह्यात स्थित वैद्यनाथ किंवा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाशी सिंह राशीचा संबंध जोडला जातो. जुन्या पौराणिक कथांनुसार, या ज्योतिर्लिंगाची स्थापना लंकेचा राजा आणि राक्षस रावणाने केला आहे. या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने आरोग्य, व्यवसाय, कौटुंबिक आणि राजकारण इत्यादींतील अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे. 

कन्या रास - मल्लिकाअर्जुन

या राशीत बुध ग्रह उच्च स्थानी आहे. वाणी, व्यवसाय, शिक्षण इत्यादी वरदान मिळण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी मल्लिकाअर्जुन ज्योतिर्लिंगाची पूजा करावी, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशात कृष्णा नदीच्या तीरावर श्रीशैल नावाच्या पर्वत शिखरावर वसलेल आहे. 

तूळ रास - महाकालेश्वर 

तूळ राशीचा संबंध महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशी जोडला जातो. तूळ राशीत शनि वरचा असून शनीचे दुसरे नाव 'काळ' असं म्हटलं जातं. तूळ राशीच्या लोकांनी अद्भूत आरोग्याचे वरदान मिळवण्यासाठी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केली होती. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने मध्य प्रदेशातील उज्जैन या पवित्र शहरात असलेल्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली आणि पूजा केल्यास अकाली मृत्यूच्या भीतीपासून ते दूर राहतो अशी मान्यात आहे. 

वृश्चिक रास - गृष्णेश्वर ज्योतिर्लिंग

वृश्चिक राशीत दुहेरी मालकीचा असून हे मंगळ आणि केतू यांचं वचर्स्व आहे. मंगळ आणि केतू या ग्रहांच्या अशुभ प्रभावांना तोंड देत असलेल्या जाचकांनी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं म्हणतात. दुधात केशर टाकून या ज्योतिर्लिंगाला अभिषेक करण्यात यावे. हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. 

धनु रास - काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग 

हे बृहस्पतिचे मूलत्रिकोण रास असून जीवन, मोक्ष हे दर्शवितो.  काशी विश्वनाथ हे जीवाला मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे नेतो अशी मान्यता आहे. विश्वनाथ म्हणजे जगाचा मालक किंवा स्वामी, म्हणून भगवान शिव इथे सर्वोच्च देवता म्हणून वास्तव करतो. धनु राशीच्या लोकांनी या ज्योतिर्लिंगाचा अभिषेक करावा किंवा काशी विश्वनाथाचे ध्यान करुन शिवलिंगाला दुधाने आणि जलाने अभिषेक करणे शुभ मानले जाते. हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात आहे. 

मकर रास - भीमाशंकर ज्योतिर्लिंग

मकर राशीत मंगळाची उन्नती असून कर्क राशीच्या कमकुवत राशीत मंगळ असेल किंवा त्यांच्या जन्मपत्रिकेच्या सातव्या भावात मंगळ असल्यास या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र दिला जातो. मोतेश्वर महादेव या नावानेही हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील पुण्यात हे मंदिर आहे. मकर राशीच्या लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करून दूध आणि जलाने अभिषेक करावं. 

कुंभ रास - केदारनाथ ज्योतिर्लिंग

हे ज्योतिर्लिंग उत्तराखंडमध्ये असून ते कुंभ राशीशी जोडल गेले आहे. कुंभ राशीच्या लोकांनी शक्य असल्यास केदारनाथला भेट द्यावी किंवा त्यांनी केदारनाथचे ध्यान करून जवळच्या कोणत्याही शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. त्यांनी कमळाचं फूल आणि धतुरा अर्पण करावे. 

मीन रास - त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग 

मीन राशीत शुक्र उच्च असून शुक्र लक्झरी, आराम आणि सांसारिक सुख देणारा कारक आहे. ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेच्या सहाव्या घरात शुक्र असतो त्यांनी या ज्योतिर्लिंगाची पूजा करावी, असं सांगण्यात आलंय. गंगाजलात गूळ मिसळून त्र्यंबकेश्वराचे ध्यान करून हे ज्योतिर्लिंग किंवा जवळचे शिवलिंगाला अर्पण करावं. हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक शहरात वसलेलं आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)